ETV Bharat / city

Deputy CM Ajit Pawar on governor : माझे ते विधान राज्यपालांशी जोडू नका - उपमुख्यमंत्री अजित पवार

author img

By

Published : Mar 7, 2022, 3:14 PM IST

महत्वाच्या पदावरील व्यक्तींकडून महनीय व्यक्तींचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. माझे ते वक्तव्य राज्यपालांशी जोडू नका, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar on governor ) यांनी केले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान विधान परिषदेत ते बोलत होते.

Deputy CM Ajit Pawar on governor
राज्यपाल कोश्यारी विधान अजित पवार प्रतिक्रिया

मुंबई - महत्वाच्या पदावरील व्यक्तींकडून महनीय व्यक्तींचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. माझे ते वक्तव्य राज्यपालांशी जोडू नका, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar on governor ) यांनी केले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान विधान परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा - Malik in judicial custody: अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांना न्यायालयीन कोठडी

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केले होते. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मनातील सल बोलून दाखवली होती. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांनी अभिभाषण मांडले. विधानसभेत यावेळी गदारोळ झाल्याने राज्यपालांनी अभिभाषण अर्धवट सोडून सभागृह सोडले होते.

विधान परिषदेत आज अभिभाषण चर्चेसाठी ठेवले. भाजपचे सदस्य अभिजात वंजारी यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभाराचा प्रस्ताव मांडला. सर्वपक्षीय सदस्यांनी प्रस्तावाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी राज्यपालांच्या विधानांवर आक्षेप नोंदवला. उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना याबाबत तक्रार केल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर हरकत घेत, मी कोणत्याही एका व्यक्तीचा उल्लेख केलेला नाही. काही महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तींकडून असे विधान होत आहेत. पंतप्रधानांना याबाबत केवळ सूचित केले. माझ्या विधानांचा राज्यापालांशी थेट संबंध जोडू नये, असे स्पष्टीकरण पवार यांनी केले. तर, महत्वाच्या पदावरील व्यक्तींनी जबाबदारी आणि भान ठेवून बोलायला हवे. सगळ्याच राजकीय पक्षांनी दक्षता पाळायला हवी, असे मत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडले.

हेही वाचा - Mumbai Mayor On BJP : भाजपमध्ये सामील झालेले लगेच स्वच्छ होऊन जातात - महापौर पेडणेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.