ETV Bharat / city

MH gov Cabinet Expansion : दिल्लीत आज होणार शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराची खलबत्ते?

author img

By

Published : Jul 22, 2022, 1:27 PM IST

स्नेहभोजन समारंभ सायंकाळी ७ ते १० या वेळेत होणार आहे. त्यानंतर शिंदे फडवणीस भाजप श्रेष्ठींशी मंत्रिमंडळ विस्तार व खाते वाटपाबाबत चर्चा करणार असल्याचेही समजते. शिंदे - फडवणीस दिल्लीत असले तरी राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाबाबत या भेटीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार हा शनिवारी किंवा रविवारी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

शिंदे फडणवीस
शिंदे फडणवीस

मुंबई - राज्यात झालेल्या नाट्यमय सतांतरानंतर शिंदे- फडणीस सरकारचा ( Shinde Fadnavis government ) ३० जून रोजी शपथविधी झाला. या शपथविधीला २२ दिवस उलटले असले तरी अजूनही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊ ( MH cabinet expansion ) शकलेला नाही. न्यायालयातील अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी ( MLAs disqualification petition ) हे या मागचे मोठे कारण सांगितले जात आहे. असे असले तरी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज दिल्लीत खलबत्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत.

शनिवारी किंवा रविवारी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता? - देशाचे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्मणार्थ नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे आज दिल्ली दौऱ्यावर ( Shinde Fadnavis Delhi Visit ) आहेत. स्नेहभोजनाच्या निमित्ताने शिंदे - फडवणीस दिल्लीत असले तरी राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाबाबत या भेटीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार हा शनिवारी किंवा रविवारी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.


स्नेहभोजनानंतर चर्चा?- मावळचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्मरणार्थ दिल्लीत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी देशातील सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे सायंकाळी चार वाजता दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. स्नेहभोजन समारंभ सायंकाळी ७ ते १० या वेळेत होणार आहे. त्यानंतर शिंदे फडवणीस भाजप श्रेष्ठींशी मंत्रिमंडळ विस्तार व खाते वाटपाबाबत चर्चा करणार असल्याचेही समजते. राज्यातील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार असल्याकारणाने आता न्यायालयीन तिढा सुद्धा निर्माण झालेला आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत असताना याबाबत या न्यायालयीन प्रक्रियेवर ही चर्चा होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.




मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे- फडवणीस यांच्यावर दबाव? - राज्यात सध्या शिंदे - फडवणीस या दोघांचेच मंत्रिमंडळ असल्याने जनतेसह समाज माध्यमातून सुद्धा त्यांच्यावर टीका होत आहे. विरोधक सुद्धा या प्रश्नावर आक्रमक झाले असून शिंदे- फडवणीस यांच्यावर मंत्रिमंडळ विस्तार तातडीने करण्याचा दबाव सुद्धा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे- फडवणीस आपल्या दिल्ली भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप श्रेष्ठींशी चर्चा करतील व हा मुद्दा तडीस नेण्यासाठी योग्य तो निर्णय लवकरच घेतील अशीही माहिती समोर येत आहे.

हेही वाचा-Suhas Kandes Posters In Manmad: "माझं काय चुकलं" म्हणत सुहास कांदे यांची मनमाड शहरात पोस्टरबाजी

हेही वाचा-Devgiri bungalow : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांना देवगिरी देणार का?

Also Read- Aditya Thackeray Aurangabad Visit: Aditya Thackeray will make a show of strength against rebel MLAs

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.