ETV Bharat / city

सौदी अरेबिया इंधन हल्ल्याचा परिणाम: मुंबईत डिझेल-पेट्रोलचे भाव वाढले

author img

By

Published : Sep 24, 2019, 1:24 PM IST

मुंबईत डिझेल-पेट्रोलचे भाव वाढले

मुंबईतील डिझेल- पेट्रोलचे सात दिवस सलग वाढत आहेत. पट्रोलचे दर २ रुपयानी तर डिझेलचे दर१.५१ रुपये प्रती लिटरने वाढले आहेत.

मुंबई - सौदी अरेबियातील तेल प्रकल्पावर हल्ल्यानंतर जगभरातील कच्च्या तेलाच्या बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे सात दिवसात मुंबईत पेट्रोलचे दर २ रुपये तर डिझेलचे दर १.५१ रुपये प्रति लिटर वाढले आहे. २०१७ पासून पेट्रोलचे दर दररोज ठरविले जात आहे. तेव्हापासून ही सर्वात मोठी वाढ आहे. आज पुन्हा मुंबईच्या पेट्रोलच्या दरात २७ पैशांनी वाढ झाली आणि पेट्रोल प्रति लिटर ७९.५२ रुपये प्रति लिटर पोहोचलेले. आज मुंबईत डिझेलचे दर १८ पैशाने वाढली आणि प्रतिलिटर ७०.१६ रुपयावर पोहोचले.त्याचा फटका लोकांना बसतोय.भारतात ८३ टक्के इंधन हे आयात केले जाते. सौदी मध्ये परिणाम झाला त्याचे ,भारतात ही इंधन दरात परिणाम दिसू लागले आहेत.

मुंबईत डिझेल-पेट्रोलचे भाव वाढले

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिसूचनेनुसार इंधनाच्या दरात सलग सातव्या दिवशी वाढ झाली आहे. १७ सप्टेंबर पासून पेट्रोलच्या दरात एकूण २ रुपयाची वाढ झाली आहे. याच काळात डिझेल १.५१ रुपयांनी महागले आहे. सौदी अरेबियातील प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात पाच टक्क्यांनी घट झाली आहे. सौदी अरेबियने स्पष्ट केली आहे की पुरवठा लवकरच सामान्य केला जाईल. मात्र, तज्ञाचे असे म्हणणे आहे की याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर अनेक वर्षे दिसून येईल.

भारत आपल्या तेल आयातीपैकी पाचव्या हिषासाठी सौदीवर अवलंबून आहे. सौदी हा भारताचा सर्वात मोठा दुसरा तेल पुरवठादार आहे. सौदी अरेबिया कडून भारताला दर महिन्यात २० लाख टन कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो. सप्टेंबर महिन्यात यातील १२ ते १३ लाखाचा तेलाचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे आता इंधन दरात वाढ झाली आहे, असे चित्र आहे. आज मुंबईत पेट्रोल व डिझेलचे दर पुढीलप्रमाणे आहेत. पेट्रोल ७९.५२ व ७०.१६ डिझेलचे दर आहेत. त्यामुळे मुंबईकर नागरिक दर वाढीवर काहीतरी सरकारने करा असे म्हणत आहे.

Intro: मुंबईत डिझेल-पेट्रोलचे भाव वाढले;नागरिक त्रस्त

सौदी अरेबियातील तेल प्रकल्पावर हल्ल्यानंतर जगभरातील कच्च्या तेलाच्या बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे सात दिवसात मुंबईत पेट्रोलचे दर २ रुपये तर डिझेलचे दर १.५१ रुपये प्रति लिटर वाढले आहे. २०१७ पासून पेट्रोलचे दर दररोज ठरविले जात आहे. तेव्हापासून ही सर्वात मोठी वाढ आहे. आज पुन्हा मुंबईच्या पेट्रोलच्या दरात २७ पैशांनी वाढ झाली आणि पेट्रोल प्रति लिटर ७९.५२ रुपये प्रति लिटर पोहोचलेले. आज मुंबईत डिझेलचे दर १८ पैशाने वाढली आणि प्रतिलिटर ७०.१६ रुपयावर पोहोचले.त्याचा फटका लोकांना बसतोय.भारतात ८३ टक्के इंधन हे आयात केले जाते. सौदी मध्ये परिणाम झाला त्याचे ,भारतात ही इंधन दरात परिणाम दिसू लागले आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिसूचनेनुसार इंधनाच्या दरात सलग सातव्या दिवशी वाढ झाली आहे. १७ सप्टेंबर पासून पेट्रोलच्या दरात एकूण २ रुपयाची वाढ झाली आहे.याच काळात डिझेल १.५१ रुपयांनी महागले आहे.सौदी अरेबियातील प्रकल्पावर झालेले ड्रोन हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे पुरवठ्यात पाच टक्क्यांनी घट झाली आहे.अर्थात सौदी अरेबियन स्पष्ट केली आहे की पुरवठा लवकरच सामान्य केला जाईल पण तज्ञाची असे म्हणणे आहे की याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर अनेक वर्षे दिसून येईल…

भारत आपल्या तेल आयातीपैकी पाचव्या हिषासाठी सौदीवर अवलंबून आहे. सौदी हा भारताचा सर्वात मोठा दुसरा तेल पुरवठादार आहे. सौदी अरेबिया कडून भारताला दर महिन्यात २० लाख टन कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो. सप्टेंबर महिन्यात यातील १२ ते १३ लाखाचा तेलाचा पुरवठा झाला आहे.त्यामुळे आता इंधन दरात वाढ झाली आहे असे चित्र आहे.आज मुंबईत पेट्रोल व डिझेलचे दर पुढीलप्रमाणे आहेत पेट्रोल ७९.५२ व ७०.१६ डिझेलचे दर आहेत.त्यामुळे मुंबईकर नागरिक दर वाढीवर काहीतरी सरकारने करा असे म्हणत आहे.



Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.