ETV Bharat / city

Devendra Fadnavis on PM Security : पंतप्रधानांचा ताफा अडवणे हे काँग्रेसचे षड्यंत्र- देवेंद्र फडणवीस

author img

By

Published : Jan 6, 2022, 3:53 PM IST

Updated : Jan 6, 2022, 6:14 PM IST

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

पंतप्रधानांच्या ताफ्यात काही त्रुटी समोर आल्या आहेत. हे जाणीवपूर्वक ( Devendra Fadnavis alleges Congress conspiracy ) पंजाब सरकारने केल्याचा ( Devendra Fadnavis slammed Punjab congress ) आरोपही देवेंद्र फडवणीस यांनी लगावला आहे. पंजाब सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल, असेही फडवणीस यांनी सांगितले आहे.

मुंबई - पंजाबमध्ये फिरोजपूर जिल्ह्यातील हुसैनीवालाजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्या होत्या. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी यासाठी काँग्रेसला जबाबदार ठरविले ( Devendra Fadnavis slammed Punjab congress ) आहे. काँग्रेसने केलेले हे षड्यंत्र असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेस पक्षाने केलेले षड्यंत्र-

पंतप्रधानांच्या सुरक्षेत काही त्रुटी समोर ( PM security issue in Punjab ) आल्या आहेत. त्यासाठी पूर्णपणे काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसने जाणीवपूर्वक केलेले हे षड्यंत्र आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, की पंतप्रधान पुलावर अडकले असताना पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा फोनसुद्धा घेतला नाही, ही फार मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. पंतप्रधान जाणाऱ्या मार्गावर जाणीवपूर्वक आंदोलनाला पंजाब सरकारने परवानगी दिली. त्यांना थांबविले नाही. उलट त्यांना तिकडचा रस्ता जाम करण्यासाठी प्रोत्साहित केले. हे आंदोलन करते काँग्रेसचे कार्यकर्ते होते, याचा खुलासाही झाला आहे. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची त्याला मूकसंमती होती का? हा प्रश्नही उपस्थित होतो, असेही फडणवीस म्हणाले. त्या कारणाने पंतप्रधानांना तिथे १५ ते २० मिनिटे अडकून राहावे लागले. त्यासोबत ज्या ठिकाणी पंतप्रधान अडकले होते तेथून पाकिस्तानची सीमा जास्त अंतरावर नाही. अशामध्ये एखादी अप्रिय घटना सुद्धा घडू शकली असती. पंतप्रधानांचा जीव धोक्यात घालण्याचे काम आहे. हे जाणीवपूर्वक ( Devendra Fadnavis alleges Congress conspiracy ) पंजाब सरकारने केल्याचा आरोपही देवेंद्र फडवणीस यांनी लगावला आहे. पंजाब सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल, असेही फडवणीस यांनी सांगितले आहे.

आंदोलन करते काँग्रेसचे कार्यकर्ते होते

हेही वाचा-Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली सुब्रमण्यम स्वामींची एअर इंडिया निर्गुंतवणूक याचिका

अचानक मार्ग बदलण्यात आला नाही!

जेव्हा एखादी मोठी किंवा पंतप्रधानासारखी व्यक्ती दौर्‍यावर असते, तेव्हा सुरक्षेसंदर्भात त्या राज्याबरोबर एक नियमावली तयार केली जाते. या संदर्भामध्ये एसओपी आहे. त्याचे पालन करावे लागते. एसपीजी कायद्याची नियम पुस्तिका आहे. ही नियम पुस्तिका पंतप्रधान दौऱ्यावर येण्याअगोदर भरली जाते. त्यानंतर राज्याच्या गृहविभागाने सहमती दिल्यानंतर पंतप्रधानांच्या दौऱ्याला परवानगी दिली जाते. पंतप्रधानांचा मार्ग काही अचानक बदलण्यात आला नाही. पंतप्रधानासारखी व्यक्ती जेव्हा एखादा दौरा करते, तेव्हा त्याला पर्यायी दुसरा मार्गसुद्धा सुचवला गेलेला असतो. त्या अनुषंगाने पंतप्रधानांचा मार्ग अगोदरच सुचवण्यात आला होता. त्याबाबत पंजाब पोलिसांकडून त्याला क्लिअरन्सही देण्यात आला होता, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. म्हणून पंतप्रधानांनी अचानक मार्ग बदलला, हे सांगणे चुकीचे आहे असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-Narendra Modi In Punjab : तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा, मी भटिंडा विमानतळावर जिवंत आलो... मोदींनी अधिकाऱ्यांना सांगितले

काँग्रेसची अपरिपक्वता यातून दिसते

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, की या घटनेचा आम्ही निषेध करत ( Devendra Fadnavis protest congress ) आहोत. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये राष्ट्रपतींनी गांभीर्याने घ्यावे. पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत त्रुटी आढळल्या त्यासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एखाद्या पंतप्रधानांवर जेव्हा हल्ला होतो तर तो पंतप्रधानांवर नाही, तर देशावर असतो. काँग्रेसचे नेते ज्या बेशर्मीने पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत वक्तव्य करत आहेत, हे कृत्य म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. १२५ वर्षांपेक्षा जास्त काळ झालेल्या काँग्रेस पक्षाची अपरिपक्वता यातून दिसून येते. देशहिताचा विचार सोडून काँग्रेसची अपरिपक्वतेची मनोवृत्ती, यामध्ये दिसते. त्याचा आम्ही निषेध करतो असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत घोडचूक, 20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकला ताफा



कडक निर्बंध की पुन्हा लॉक डाऊन!

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस म्हणाले, की की राज्यात सध्या सरकारमध्ये एकसूत्रता नाही आहे. कोरोना मार्गदर्शन संदर्भामध्ये राज्य सरकार काय निर्णय घेणार? नेमका कोण घेणार? हे आम्हाला समजले पाहिजे.




Last Updated :Jan 6, 2022, 6:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.