ETV Bharat / city

ST Workers Promotion Exam : संप मोडीत काढण्यासाठी खात्याअंतर्गत बढती परीक्षेचा घाट; हजारो कर्मचारी परीक्षेस मुकणार ?

author img

By

Published : Dec 11, 2021, 5:13 PM IST

राज्यात गेल्या जवळपास दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एकीकडे संपावर गेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर (ST Worker Strike) कारवाई सुरू आहे. तर दुसरीकडे आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बढतीसाठी परीक्षा (ST Workers Promotion Exam) घेण्याचा घाट घातला आहे. महामंडळातील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक व वाहतूक नियंत्रक या संवर्गाच्या खात्यांतर्गत बढती लेखी परीक्षा २६ डिसेंबर २०२१ रोजी घेण्याची घोषणा केली आहे. यामुळे एसटी महामंडळातील शेकडो कर्मचारी या बढती परीक्षांपासून वंचित राहणार आहे.

ST Exam
ST Exam

मुंबई - एकीकडे संपावर गेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर (ST Worker Strike) कारवाई सुरू आहे. तर दुसरीकडे आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बढतीसाठी परीक्षा (ST Workers Promotion Exam) घेण्याचा घाट घातला आहे. महामंडळातील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक व वाहतूक नियंत्रक या संवर्गाच्या खात्यांतर्गत बढती लेखी परीक्षा २६ डिसेंबर २०२१ रोजी घेण्याची घोषणा (Departmental promotion examination in ST ) केली आहे. यामुळे एसटी महामंडळातील शेकडो कर्मचारी या बढती परीक्षांपासून वंचित राहणार आहे.

हजारो एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान -

गेल्या एका महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अनेकदा कामावर हजर होण्याचे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून करण्यात आले आहे. मात्र, कर्मचारी संपावर ठाम असल्याने महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे. हा संप मोडून काढण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यत एसटी महामंडळाने १० हजारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तर दोन हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या आहे. तरी ही एसटी कामगारांचा संप मोडून काढण्यात महामंडळाला अपयश येत आहे. आता तर चक्क एसटी महामंडळाने महामंडळातील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक वाहतूक निरिक्षक व वाहतूक नियंत्रक या संवर्गाच्या खात्यांतर्गत बढती लेखी परीक्षा (Departmental promotion examination in ST ) घेण्याचा घाट महामंडळाने घातला आहे. परीक्षा घेण्याबाबत महामंडळाने परिपत्रक सुद्धा काढले आहे. जर एसटी कर्मचारी परीक्षेला हजर झाले नाही, तर हजारों कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार आहे.

Departmental promotion examination in ST
एसटी विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले परिपत्रक
काय आहे आदेश -
वरिष्ठ लिपिक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक व वाहतूक नियंत्रक या संवर्गाच्या खात्यांतर्गत बढती लेखी परीक्षेचे आयोजन रविवार, २६ डिसेंबर २०२१ घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी केंद्र ठरविणे व संनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक करणे इत्यादी सर्व कार्यवाही संबंधित विभाग नियंत्रक यांनी करावयाची असून रा.प.मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी-पुणे, औरंगाबाद व नागपूर येथील सदर परीक्षेसाठी केंद्र ठरविणे व संनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक करणे इत्यादी सर्व कार्यवाही संबंधित कार्यशाळा व्यवस्थापक यांनी करावयाची आहे. तीनही पदांच्या बढती परीक्षेसाठी सर्व विभाग / घटकातील सहाय्यक / विभागीय कर्मचारीवर्ग अधिकारी किंवा आस्थापना पर्यवेक्षक किंवा संबंधित प्रतिनिधी यांना अधिकार पत्र देऊन रा.प. मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे दिनांक २३ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता हजर राहून आपल्या विभागासाठीचा प्रश्नपत्रिका संच ताब्यात घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
हजारो कर्मचारी परीक्षेस मुकणार -
महामंडळाकडे सध्या विविध सेवा देणारे सुमारे ९२ हजार २६६ लाख कर्मचारी आहेत. सेवेवरील उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांना महामंडळात बढतीसाठी परीक्षा देता येते. महामंडळाकडून खात्याअंतर्गत बढतीसाठी शेवटची परीक्षा डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर कोरोनामुळे परीक्षाच झाली नाही. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या जागा विचारात घेऊन जागा भरण्यासाठी खात्याअंतर्गत बढती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळातील ३ वर्ष सेवा पूर्ण करणारे हजारो कर्मचारी या परीक्षेची वाट पाहात होते. अखेर एसटी महामंडळाने संप सुरु असलताना ही परीक्षा घेण्याचा घाट घातलेला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचा कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. जर संप २६ डिसेंबर २०२१ पर्यत सुरूच राहिला तर हजारो कर्मचारी परीक्षेस मुकणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.