ETV Bharat / city

Deepali sayyad challenged to MNS : अयोध्येत सभा घेऊन दाखवा, शिवसेनेचा मनसेला चिमटा

author img

By

Published : May 17, 2022, 1:17 PM IST

शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मनसे नेते राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि लवकरच ते अयोध्या दौऱ्यावर जाणार (Raj Thackerays Ayodhya tour ) आहेत, त्यावरुन शिवसेनेच्या प्रवक्त्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करुन मनसेला डिवचले आहे. पुण्यात कसल्या सभा घेताय, सभा घ्यायच्याच असतील तर अयोध्या घ्या, असे ट्विट दीपाली सय्यद यांनी केले आहे. याला मनसे आता कसे उत्तर देणार हे पाहावे लागेल.

Deepali sayyad tweeted and challenged MNS to hold a meeting in Ayodhya
दीपाली सय्यद यांनी ट्विट करुन मनसेला डिवचले

मुंबई - मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena (MNS) Raj Thackeray ) पुण्यात सभा घेणार आहेत. शिवसेनेने या सभेवरून मनसेला चिमटा काढला. पुण्यात कसल्या सभा घेताय, सभा घ्यायच्याच असतील तर आयोध्या घ्या, असे ट्विट करत शिवसेनेच्या प्रवक्त्या दीपाली सय्यद ( Dipali sayyad ) यांनी राज ठाकरे यांना डिवचले आहे. मनसे याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  • सभा करायच्याच असतील तर आयोध्या मध्ये करून दाखवा पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात तेही जास्त गर्दी करून. @ShivSena @RajThackeray @mnsadhikrut

    — Deepali Sayed (@deepalisayed) May 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
अयोध्येत जाण्यासाठी माफी मागणार का ? - मुंबईत झालेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसाचा मुद्दा उपस्थित करत हिन्दुत्वाची कास धरली. तसेच येत्या पाच जूनला जाणार असल्याची घोषणा केली. मनसेच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा असला तरी भाजपचे खासदार बृजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला आहे. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत तरी राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू दिला जाणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. बृजभूषण यांच्या भूमिकेमुळे राज ठाकरे यांची गोची झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे, अयोध्येला जाण्यासाठी उत्तर भारतीयांची माफी मागणार का? उत्तर भारतीयांना अंगावर घेणार, याबाबत सध्यातरी सांशकता आहे.
अयोध्येत सभा घ्या - राज ठाकरे मे महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. 21 मे किंवा 29 मे रोजी राज ठाकरेंची सभा होण्याची शक्यता आहे. सभेला परवानगी मिळावी, यासाठी पुणे पोलीस ठाण्यात मनसेच्यावतीने अर्ज करण्यात आला आहे. पोलिसांकडून परवानगी मिळाल्यानंतर सभेची तारीख निश्चित होईल. या सभेवरून शिवसेनेच्या प्रवक्त्या दीपाली सय्यद यांनी ट्विटच्या माध्यमातून मनसेवर निशाणा साधला. दीपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सभा करायच्या असतील तर अयोध्यामध्ये करून दाखवा. पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा सभा घेतात, तेही जास्त गर्दी करून असा टोला लगावला आहे. शिवसेनेच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना मुन्नाभाईची उपमा देत, चौफेर टीकास्त्र सोडले होते. शिवसेनेकडून सातत्याने होणाऱ्या या टीकेला राज ठाकरे कसे प्रत्युत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.