ETV Bharat / city

इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांना फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करा - ईडी

author img

By

Published : Dec 4, 2020, 9:16 PM IST

इक्बाल मिर्ची
इक्बाल मिर्ची

ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर मिर्चीच्या कुटुंबातील तीन सदस्यांविरूद्ध मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने अजामीनपात्र वॉरंटही जारी केले आहे. ईडीने इक्बाल मिर्चीच्या कुटूंबाला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे.

मुंबई - माफिया इक्बाल मिर्चीच्या कुटुंबातील तीन सदस्यांना फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई न्यायालयात धाव घेतली आहे. इक्बाल मिर्चीचे 2013 मध्ये निधन झाले. फरार आर्थिक गुन्हेगार कायद्याच्या कलम 12 आणि 4 अंतर्गत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या इक्बाल मिर्चीचे 2013 मध्ये निधन झाले. त्यानंतर त्याच्या देशातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या संपत्तीवर ईडी कडून टाच आणली जात आहे. दरम्यान, इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांना आर्थिक गुन्हेगार घोषित करावे, अशी याचिका ईडी कडून पीएमएल कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे.

अजामीनपात्र वॉरंट जारी-

इक्बाल मिर्चीची पत्नी हाजरा मेमन, जुनेद इक्बाल मेमन व आसिफ इक्बाल मेमन या तिघांना आर्थिक गुन्हेगार घोषित करावे, अशी मागणी ईडीने न्यायालयात केली आहे. ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर मिर्चीच्या कुटुंबातील तीन सदस्यांविरूद्ध मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने अजामीनपात्र वॉरंटही जारी केले आहे.

आता पर्यंत 700 कोटींची मालमता जप्त-

मुंबईतील केजे हाऊस इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील तब्बल 96 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीला जप्त करायची आहे. अशी परवानगी देण्याची विनंती ईडीकडून न्यायालयाला करण्यात आलेली आहे. आतापर्यंत इक्बाल मिर्ची व त्याच्या कुटुंबीयांची ईडीनें 750 कोटीहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. अजूनही इक्बाल मिर्चीच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या संपत्तीचा शोध ईडीकडून घेतला जात आहे.

हेही वाचा- विधान परिषद निवडणूक : ५८ वर्षांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला नागपुरात खिंडार, पुण्याचाही गड केला काबिज

हेही वाचा- शेतकरी आंदोलन : देशभरात पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेचे दहन करणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.