ETV Bharat / city

Bitcoin Rate Today : बिटकॉइनसह इथेरिअम कॉईनच्या दरांमध्येही घसरण.. पहा आजचे दर

author img

By

Published : Jul 12, 2022, 7:23 AM IST

CRYPTOCURRENCY PRICES TODAY 12 JULY 2022
बिटकॉइनसह इथेरिअम कॉईनच्या दरांमध्येही घसरण.. पहा आजचे दर

गेल्या २४ तासांत बिटकॉइनच्या दरांमध्ये ०.४० टक्क्यांनी घट झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे. गेल्या दोन महिन्यापासून बिटकॉइनच्या किमतीत घसरण सुरु आहे. त्यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. बिटकॉइन गेल्या आठवड्यात सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला होता. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १५ लाख ७८ हजार ६९८ रुपये इतकी आहे.

मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. तीन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १५ लाख ७८ हजार ६९८ रुपये इतकी आहे. कालच्या तुलनेत आज बिटकॉइनचे भाव उतरले आहेत.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १९ हजार ८६२ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १५ लाख ७८ हजार ६९८ रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार ०८८ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ८६ हजार ४७३ रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०६२ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ४.९३ रुपये इतका आहे.

हेही वाचा : Gold Silver Rates : सोने- चांदीच्या भावात किरकोळ बदल.. पहा आजचे देशभरातील दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.