ETV Bharat / city

Bitcoin Rate Today : बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांना धक्का.. दर गडगडले.. पहा आजच्या किमती..

author img

By

Published : Jul 10, 2022, 6:58 AM IST

CRYPTOCURRENCY PRICES TODAY 10 JULY 2022
बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांना धक्का.. दर गडगडले.. पहा आजच्या किमती..

गेल्या २४ तासांत बिटकॉइनच्या दरांमध्ये ०.७९ टक्के रुपयांनी घट झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे. गेल्या दोन महिन्यापासून बिटकॉइनच्या किमतीत घसरण सुरु आहे. त्यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. बिटकॉइन गेल्या आठवड्यात सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला होता. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १६ लाख ९७ हजार ९३६ रुपये इतकी आहे.

मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. दोन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १६ लाख ९७ हजार ९३६ रुपये इतकी आहे. कालच्या तुलनेत आज बिटकॉइनचे भाव उतरले आहेत.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २१ हजार ४३२ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १६ लाख ९७ हजार ९३६ रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार २१३ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ९६ हजार १०८ रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०६९ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ५.४५ रुपये इतका आहे.


हेही वाचा : Gold Silver Rates : सोन्यासह चांदीच्याही दरामध्ये वाढ.. पहा आजचे देशभरातील दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.