ETV Bharat / city

स्टार प्रवाह वाहिनीचे लसीकरण मोहिमेत ‘असेही’ योगदान!

author img

By

Published : Jul 4, 2021, 2:21 AM IST

स्टार प्रवाह वाहिनी
स्टार प्रवाह वाहिनी

अनेकजण लसीकरणासाठी लसीकरण केंद्रांवर हजेरी लावत असून थोड्याफार प्रमाणात तिथे गर्दी होत आहे. त्यामुळे बरेच जण आपली लसीकरणाची पाळी येईस्तोवर तिष्ठत बसलेले असतात. या कठीण काळात अनेकजण सामाजिक बांधिलकी जपत लसीकरण उपक्रमाला पाठिंबा देताना दिसताहेत. यात स्टार प्रवाह वाहिनीचाही नंबर लागतो.

मुंबई - कोरोना महामारीमुळे त्रस्त असलेल्या जनतेला कोरोना प्रतिबंधक लस हा एक मोठा आधार आहे. देशातील लसीकरण उपक्रम जोरात सुरु असून आतापर्यंत जगातील सर्वात जास्त लोकांचे लसीकरण झालेल्यात भारत आघाडीवर आहे. अनेकजण लसीकरणासाठी लसीकरण केंद्रांवर हजेरी लावत असून थोड्याफार प्रमाणात तिथे गर्दी होत आहे. त्यामुळे बरेच जण आपली लसीकरणाची पाळी येईस्तोवर तिष्ठत बसलेले असतात. या कठीण काळात अनेकजण सामाजिक बांधिलकी जपत लसीकरण उपक्रमाला पाठिंबा देताना दिसताहेत. यात स्टार प्रवाह वाहिनीचाही नंबर लागतो.

स्टार प्रवाह वाहिनी
स्टार प्रवाह वाहिनी

वाहिन्यांच्या टीआरपी रेस मध्ये नेहमीच आघाडीवर असलेली महाराष्ट्राची नंबर एक वाहिनी म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनी. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दर्जेदार कार्यक्रम सादर करत असतानाच ही वाहिनी वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवत प्रेक्षकांच्या कुटुंबाचा देखील भाग होत असते. कोरोना काळात सुरक्षिततेसाठी केलेलं मास्कचं वाटप असो वा पडद्यामागच्या कलाकारांच्या घरी गणरायाची मूर्ती पोहोचवण्याचं काम असो स्टार प्रवाह वाहिनीने नेहमीच अश्या निरनिराळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

एक अनोखा उपक्रम राबवताना महाराष्ट्रातील लसीकरण केंद्रांवर स्टार प्रवाहकडून टीव्हीची सोय करण्यात आली असून त्यामुळे लसीकरणाआधी आणि लसीकरणानंतर थांबाव्या लागणाऱ्या लोकांचे मनोरंजन होत आहे. लसीकरण केंद्रावर लस घेण्याचा हा कालावधी सुखकर व्हावा आणि प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं या हेतूने स्टार प्रवाह वाहिनीच्या माध्यमातून लसीकरण केंद्रांवर टीव्हीची सोय करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लसीकरण केंद्रांवर हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत असून स्टार प्रवाहवरील कार्यक्रमांचा जनतेला आस्वाद घ्यायला मिळत आहे. या अनोख्या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळत असून लसीकरण कालावधी सुखकर होत असल्याच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. सध्याच्या घडीला कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी लसीकरण करण्यावर भर दिला जातो आहे आणि स्टार प्रवाह वाहिनी एका अनोख्या उपक्रमाने आपली सामाजिक बांधिलकी जपताना दिसते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.