ETV Bharat / city

TET Exam Scam : चौकशीअंती वस्तुस्थिती समोर येईल - नाना पटोले

author img

By

Published : Aug 8, 2022, 3:02 PM IST

Updated : Aug 8, 2022, 3:32 PM IST

नाना पटोले
नाना पटोले

टीईटी परीक्षा प्रकरणात आता शिंदे गटातील आमदार, माजी मंत्री अब्दुल सत्तार ( Former Minister Abdul Sattar ) यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आता एकच खलबल उडाली आहे. यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर अंतिम सत्य समोर येईल, असे सांगितले आहे.

मुंबई - शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले होते. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली होती. तसेच या प्रकरणाची ईडीने समांतर चौकशी सुरू केली आहे. याच प्रकरणात आता शिंदे गटातील आमदार, माजी मंत्री अब्दुल सत्तार ( Former Minister Abdul Sattar ) यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आता एकच खलबल उडाली आहे. यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर अंतिम सत्य समोर येईल, असे सांगितले आहे.

प्रतिक्रिया देताना नाना पटोले



काय म्हणाले नाना पटोले? : टीईटी घोटाळा प्रकरणात शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची मुलगी हिना कैसार अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोघींची नावे समोर आली आहेत. या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, टीईटी घोटाळा २०१४ पासून सुरुवात झाली. या घोटाळ्यात खूप लोकांचा समावेश आहे. अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत. परंतु या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाल्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल, असे सांगत हा फार मोठा घोटाळा आहे. आमचे महाविकास आघाडीचे सरकार असताना सुद्धा त्यात घोटाळा झाला. शासनाने या संदर्भात नवीन उपायोजना करायला हव्यात, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे.



सामना अग्रलेखात काँग्रेसचे प्रशंसा ही जमेची बाजू? : शिवसेनेच मुखपृष्ठ असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखात काँग्रेस पक्षाची वाहवाही करण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत मोदी सरकार विरोधात फक्त काँग्रेस लढा देत आहे व काँग्रेसकडून इतर पक्षांनीही बोध घ्यायला हवा, असे सामना अग्रलेखात सांगितले गेले आहे. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस देशातील संविधानीक व्यवस्था व लोकशाही याबद्दल नेहमी सतर्क राहिली आहे. इंग्रजांच्या विरोधात सुद्धा दोन हात करण्याच धाडस काँग्रेसने केले. परंतु आज देश विकून देश चालवला जात आहे. सर्वसामान्य जनतेच्या तोंडातील घास जीएसटीच्या माध्यमातून हिरावून घेतला जात आहे. जीएसटी किती मोठा आहे असा गवगवा केला गेला. परंतु या कारणाने संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब उध्वस्त झाली. शेतकरी देशोधडीला लागला, परंतु यावर मोदी सरकार काही बोलायला तयार नाही. महागाई, बेरोजगारी या सर्व प्रश्नांवर काँग्रेस रस्त्यावर लढत आहे. जीएसटीला राहुल गांधी यांनी गब्बर टॅक्स म्हणून संबोधित केले. परंतु त्यावर राहुल गांधी यांची टिंगल टवाळी करण्यात आली. करोनामध्ये सुद्धा त्यांच्यावर टिंगल टवाळी करण्यात आली. त्याचे परिणाम आता देशाला भोगावे लागत आहेत, असेही नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा - TET Scam in Maharashtra : मला बदनाम करण्याचे षडयंत्र : टीईटी प्रश्नावर अब्दुल सत्तार यांचे स्पष्टीकरण

Last Updated :Aug 8, 2022, 3:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.