ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन

author img

By

Published : Jun 26, 2022, 7:42 AM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे अशी परिस्थिती निर्माण झाली ( Maharashtra political crisis ) असताना शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे पूर्णपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असताना काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी ( Congress High Command Sonia Gandhi  ) यांनी सुद्धा फोन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करताना आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगितलेले आहे.

सोनिया गांधी उद्धव ठाकरे
सोनिया गांधी उद्धव ठाकरे

मुंबई-सध्या राज्यातील राजकीय समीकरणात बदल होत असताना महाविकास आघाडीच्या बाजूने शरद पवार मैदानात ( political equation in the state ) उतरलेले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांनी फोन करून उद्धव ठाकरे यांच्याशी शनिवारी चर्चा केली आहे. या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काही चिंता करू नका ( Sonia Gandhi call to Uddhav Thackeray ) असे त्यांनी बोलल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेससोबत काँग्रेसही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी- महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे अशी परिस्थिती निर्माण झाली ( Maharashtra political crisis ) असताना शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे पूर्णपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असताना काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी ( Congress High Command Sonia Gandhi ) यांनी सुद्धा फोन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करताना आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगितलेले आहे.



एकनाथ शिंदे यांची वेगळी भूमिका - राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या संख्याबळ माजली असून शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला यामुळे हादरे बसत आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाळी करत शिवसेनेतून फारकत घेतली आहे. तर आपल्यासोबत नाराज आमदारांची फौज घेत आधी सूरत आणि त्यानंतर गुवाहाटी गाठली आहे. तेथूनच आपले प्रस्ताव आणि मागण्या उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडल्या जात आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे कसे शिवसेनेचे नुकसान होत आहे यावर बोलले जात आहे. यादरम्यान काँग्रेसच्या नेत्या आणि अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधला आहे. तसेच त्यांनी बोलताना, काँग्रेस पक्ष ही या कठीण समयी शिवसेनेसोबत असल्याचे म्हटलं आहे.

काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ- विशेष म्हणजे यापूर्वी ही राज्यात ही परिस्थिती निर्माण झाल्यावर काँग्रेसचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे मुंबईत आले असताना त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे ४४ आमदार हे पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असून कुठल्याही परिस्थितीमध्ये ते त्यांच्याशी एकनिष्ठ राहणार असे सांगितले आहे.

हेही वाचा-Shiv Sena Workers Reaction : 'आम्ही उद्धव साहेबांसोबत, बाकीचे आम्हाला काही माहिती नाही'; शिवसैनिकांचे मत

हेही वाचा-Rebel MLA Dilip Kesarkar Press : दिपक केसरकरांनी सांगितली शिवसेना आमदारांच्या बंडाची खदखदं, पाहा व्हिडिओ

हेही वाचा-Eknath Shinde : 'मविआसारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठी लढतोय'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.