Sachin Sawant Criticized Bjp : काश्मिरी पंडितांच्या दुखाग्नीवर, भाजपाने फक्त राजकीय पोळ्या भाजल्या; सावंतांची टीका

author img

By

Published : May 14, 2022, 1:29 PM IST

Sachin Sawant

मोदी सरकारने गेली ८ वर्षे काश्मिरी पंडितांच्या ( Kashmir Pandit ) दुखाग्नीवर राजकीय पोळ्या भाजल्या आणि सत्तेच्या बाजारात काश्मीरी पंडितांचे दुःख विकले हे स्पष्ट झाले आहे, असा सचिन सावंत यांनी केला ( Sachin Sawant Criticized Bjp ) आहे.

मुंबई - काश्मिरी पंडितांबद्दल भाजपला काहीही देणेघेणे नाही. त्यांच्याबद्दलचा कळवळा हा केवळ देखावा होता. राहुल भट या तरुणाच्या हत्येसोबत ( Kashmiri Pandit Rahul Bhat Killing ) लाखो काश्मिरी पंडितांच्या आशा, आकांक्षा आणि स्वप्नांची चिताही रचली गेली आहे. काश्मिरी पंडितांच्या आजच्या विदारक परिस्थितीला भाजपाच जबाबदार आहे. मोदी सरकारने गेली ८ वर्षे काश्मिरी पंडितांच्या दुखाग्नीवर राजकीय पोळ्या भाजल्या आणि सत्तेच्या बाजारात काश्मीरी पंडितांचे दुःख विकले हे स्पष्ट झाले आहे, असा घणाघाती हल्ला प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला ( Sachin Sawant Criticized Bjp ) आहे.

मोदी सरकारच्या काळात दहशतवाद वाढला - ट्विट करत सचिन सावंत म्हणाले की, व्ही. पी. सिंह सरकारच्या काळात काश्मिरी पंडितांचे स्थलांतर झाले, त्यावेळी भाजपचेच के. जगमोहन हे राज्यपाल होते. याच काळात काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या व पलायनास मजबूर केले गेले. तरीही काश्मिरी पंडितांचे दुःख व कलम ३७० चे भांडवल सातत्याने भाजप करत राहिली. २०१९ ला ३७० कलम हटवताना काश्मिरमधील दहशतवाद संपेल व पंडितांची घरवापसी होईल, असे आश्वासन दिले. पण, मोदी सरकारच्या काळात दहशतवाद संपलेला नाही तर पूर्वीपेक्षा अधिक वाढला आहे, अशी टीकाही सावंत यांनी मोदी सरकारवर केली.

  • स्थानिक पंडितांचे जीवन धोक्यात घातले. राहुल भटच्या सरकारी कार्यालयात झालेल्या हत्येनंतर पंडित सुरक्षिततेवरुन मोदी सरकारला जाब विचारत आहेत. तर पोलिस अश्रूधूर व लाठ्यांचा वर्षाव करत आहेत. काश्मीरी पंडितांचे डोळे उघडले. भाजपाकडून धर्मांधतेची अफूची गोळी खाल्लेल्यांचे डोळेही उघडतील

    — Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'चित्रपटातून निर्मात्यांनी कमावले पण...' - देशभर मुस्लिम द्वेष पसरविण्यासाठी भाजपने काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचा, अनुपम खेरसारख्या अभिनेत्यांचा वापर केला. ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे प्रमोशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः केले. जनभावना भडकावण्यासाठी चित्रपटात अर्धसत्य व अंगावर शहारे आणणाऱ्या हिंसेचा वापर केला गेला. या चित्रपटातून निर्मात्यांनी २५० कोटींपेक्षा जास्त कमावले. पण, काश्मिरी पंडितांचे हात मात्र रिकामे राहीले, असा चिमटाही सावंत यांनी काढला आहे.

'काश्मिरी पंडित सुरक्षिततेवरुन मोदी सरकारला जाब...' - डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वातील युपीए सरकारच्या दहा वर्षांत ३००० पेक्षा जास्त पंडितांना नोकऱ्या दिल्या. ५९११ घरे बांधली पण मोदी सरकारने काहीच केले नाही. उलट काश्मिरी मुसलमानांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, काश्मिरी पंडितांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. यातून स्थानिक पंडितांचे जीव धोक्यात घातले गेले. आज जम्मू काश्मीरमध्ये भाजप नियुक्त राज्यपाल मनोज सिन्हा आहेत. त्यामुळे राहुल भटच्या सरकारी कार्यालयात झालेल्या हत्येनंतर पंडित सुरक्षिततेवरुन मोदी सरकारला जाब विचारत आहेत. आठ वर्षांत काय केले? हा प्रश्न विचारत आहेत. त्यांच्यावर पोलीस अश्रूधूर व लाठ्यांचा वर्षाव करत असल्याची टीका सावंत यांनी भाजपवर केली आहे.

हेही वाचा - Sanjay Raut : आमचा बुस्टर नाही तर, मास्टर-ब्लास्टर डोस असतो; राऊतांचा भाजपला टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.