ETV Bharat / city

विधान परिषद पोटनिवडणूक : काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांनी भरला उमेदवारी अर्ज

author img

By

Published : Nov 16, 2021, 4:11 PM IST

Updated : Nov 16, 2021, 4:50 PM IST

विधान परिषदेच्या जागेसाठी आज काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव(Pradnya Rajeev Satav) यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला(Filed Nomination Form) आहे. त्या काँग्रेसचे नेते दिवंगत राजीव सातव(Rajeev Satav) यांच्या पत्नी आहेत.

pradnya satav
प्रज्ञा सातव यांनी भरला उमेदवारी अर्ज

मुंबई - काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या मृत्यूनंतर रिकामी झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी आज काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव(Pradnya Rajeev Satav) यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला(Filed Nomination Form) आहे. त्या काँग्रेसचे नेते दिवंगत राजीव सातव(Rajeev Satav) यांच्या पत्नी आहेत. निवडणूक अधिकारी यांच्याकडे विधानभवन येथे प्रज्ञा सातव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप व इतर नेतेही उपस्थित होते.

प्रज्ञा राजीव सातव - काँग्रेस उमेदवार, विधान परिषद

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भावूक झाल्या प्रज्ञा सातव -

काँग्रेसकडून विधान परिषदेच्या एका जागेसाठी प्रज्ञा सातव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. जुलै २०२४ पर्यंत विधान परिषदेची मुदत आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीने काँग्रेसने त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नीकडे दिला आहे. राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने निधन झाले होते. त्यावेळी प्रज्ञा सातव यांना राज्यसभेत पाठवण्याची चर्चा सुरू होती, मात्र त्यांच्या जागी रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर आता काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आजच्याच दिवशी दिवंगत राजीव सातव यांच्या निधनाला सहा महिने पूर्ण झाले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी ही जबाबदारी मी घेत आहे, असे सांगताना प्रज्ञा सातव भावूक झाल्या होत्या.

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार - नाना पटोले

प्रज्ञा सातव यांच्या विरोधामध्ये भाजपचे संजय केणेकर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अशा प्रसंगी बिनविरोध निवडणूक होण्याची परंपरा राहिली असल्याने ही निवडणूकसुद्धा बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. रजनीताई पाटील यांच्या दरम्यानसुद्धा निवडणूक बिनविरोध झाली होती. तेव्हासुद्धा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या निवडणुकीदरम्यान सुद्धा ते त्यांची भेट घेणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांना विनंती करणार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

Last Updated :Nov 16, 2021, 4:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.