ETV Bharat / city

Mahavikas Aghadi : मुख्यमंत्र्यांची सामंजस्य भूमिका महाविकास आघाडीला लाभदायी; एकत्र लढल्यास भाजपाचा निभाव...

author img

By

Published : Apr 17, 2022, 7:25 PM IST

देगलूर पाठोपाठ कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत ( kolhapur North By Election ) भाजपाचा दारूण पराभव झालेला आहे. या पाठीमागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ( Cm Uddhav Thackeray ) घेतलेली सामंजस्य भूमिका महाविकास आघाडीला ( Mahavikas Aghadi ) लाभदायी ठरली आहे.

Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi

मुंबई - नुकत्याच झालेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत ( Kolhapur North By Election ) महाविकास आघाडीने ( Mahavikas Aghadi ) भाजपाचा दारुण पराभव केला. भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Cm Uddhav Thackeray ) यांनी आजवर घेतलेली सामंजस्य भूमिका महाविकास आघाडीला लाभदायी ठरल्याचे दिसून येते. आगामी काळात तिन्ही पक्ष एकत्र लढण्यास भाजपाचा टिकाव लागण्याची शक्यता धूसर आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर समसमान जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपामध्ये तिढा निर्माण झाला. शिवसेनेला डावलण्यासाठी देवेंद्र फडणवीस( Devendra Fadnavis ) यांनी अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्यासोबत युती करत सरकार स्थापन केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत किमान समान कार्यक्रमांतर्गत सत्ता स्थापन केली. त्यानंतर तिन्ही पक्षांनी भाजपाला धूळ चारण्यास सुरुवात केली आहे. पुणे, नागपूर पदवीधर मतदारसंघापासून ते कोल्हापूरच्या निकालापर्यंत हे स्पष्ट झाले आहे. भाजपाकडूनही घटकपक्षाच्या माध्यमातून आघाडी सरकारला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र, तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास आगामी काळात भाजपाचा निभाव लागणे कठीण आहे.

अन् मुख्यमंत्र्यांनी वादावर पडदा टाकला - राज्यातील विधान परिषद निवडणुकीत बहुतांश ठिकाणी भाजपाने मुसंडी मारली. नागपूरच्या विधान परिषदेत भाजपा नेते व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे विरोधात काँग्रेसच्या मंगेश देशमुख यांना उमेदवारी दिली. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडीचा धर्म पाळत काँग्रेस पाठिंबा दिला. मात्र, भाजपाचा बालेकिल्ला असल्याने बावनकुळे विजयी झाले. शिवसेनेची जागा असलेल्या अकोल्यात मात्र भाजपाचे वसंत खंडेलवाल यांना विजय मिळाला. शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना यावेळी पराभवाला सामोरे जावे लागले. आघाडीत यानंतर धुसफूस वाढली. उद्धव ठाकरेंनी सगळ्यांची समजूत काढत वादावर पडदा टाकला होता.

म्हणून कोल्हापूरचा विजय सोपा झाला - पुणे, नागपूर पदवीधर हे भाजपाचे पारंपरिक बालेकिल्ले आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र लढल्याने दोन्ही भाजपाच्या पारंपारिक मतदारसंघाला सुरुंग लावला होता. आताही कोल्हापूर उत्तरमध्ये ( Kolhapur North By Election ) शिवसेनेच्या उमेदवाराला संधी द्यावी, असा स्थानिक शिवसैनिकांचा आग्रह होता. उद्धव ठाकरेंनी हा आग्रह बाजूला ठेवून काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. शिवसेनेने यापूर्वी जरी जागा जिंकली असली तरी महाविकास आघाडीतील सूत्रानुसार काँग्रेसच निवडणूक लढवेल, अशा सूचना शिवसैनिकांना केल्या. तसेच, इच्छुक असलेल्या राजेश क्षीरसागर ( Shivsena Leader Rajesh kshirsagar ) यांची मनधरणी केली. उद्धव ठाकरेंच्या सामंजस्य भूमिकेमुळे कोल्हापूरचा विजय सहज सोपा झाला. शिवसैनिकांची नाराजी आपल्या पारड्यात पडेल आणि विजयी होऊ, या भाजपाच्या आशाआकांक्षा धुळीस मिळाल्या. आगामी काळात महाविकास आघाडी एकत्र लढल्यास पदवीधरपासून ते विधानसभा पोटनिवडणूक असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो, भाजपाला विजय मिळवणे कठीण होईल, असे बोलले जाते.

शिवसेनेमुळे काँग्रेस विजयी - नुकतीच झालेली कोल्हापूर उत्तर ( Kolhapur By Election ) आणि देगलूर बिलोली ( Deglur By Election ) मतदारसंघाच्या पोटनिवडणूक तिन्ही पक्षांनी एकत्र काम केल्याने विजय मिळाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामंजस्य भूमिका घेतलेली आहे. शिवाय तिन्ही पक्षाकडून भाजपाला रोखण्यासाठी एकत्रितरीत्या व्यूहरचना आखली. त्याचा फायदा आजपर्यंतच्या झालेल्या पोटनिवडणुकीत पाहायला मिळतो. पोटनिवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने घटक पक्षांच्या सोबतीने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. देगलूर-बिलोली मध्ये नाराज शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना गळाला लावले. मात्र, भाजपाला तेथे पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातही राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी न दिल्याने नाराज शिवसैनिक आपल्या पारड्यात मताधिक्य टाकतील, असा भाजपाला कयास होता. कडवट हिंदुत्वाचा राग निवडणुकीच्या प्रचारात काढण्यात आला. शिवसेनेने आपले मताधिक्य फुटू दिले नाही. दोन्ही पोटनिवडणुक शिवसेनेचे मत काँग्रेसच्या पारड्यात गेले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी पोटनिवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला. त्यामुळे काँग्रेसला पोटनिवडणुका जिंकता आल्या, असा अन्वार्थ राजकीय विश्लेषक दिलीप सपाटे काढतात.

हेही वाचा - Ajit pawar : मोबाईल रिचार्ज प्रमाणे विजेसाठी प्रिपेड कार्ड आणण्याचा राज्य सरकारचा विचार - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.