ETV Bharat / city

वाझेला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दबाव, परमबीर सिंग यांचा सीबीआयला जबाब

author img

By

Published : Jun 21, 2022, 9:53 AM IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Parambir Singh reply to CBI over anil deshmukh ) यांच्या कुकर्म आणि गैरव्यवहाराबद्दल सर्व ( Parambir Singh on cm uddhav thackeray ) माहित होते, असे त्यांच्या बोलण्यावरून दिसून आले होते, असे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Parambir Singh reply to CBI over waze ) यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

CM pressured to rejoin waze in police says parambir
परमबीर सिंग सीबीआय जबाब

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Parambir Singh reply to CBI over anil deshmukh ) यांच्या कुकर्म आणि गैरव्यवहाराबद्दल ( Parambir Singh on cm uddhav thackeray ) आपण माहिती दिली होती. त्यांना देखील हा सर्व प्रकार माहित होता, असे त्यांच्या बोलण्यावरून दिसून आले होते, असे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Parambir Singh reply to CBI over waze ) यांनी सीबीआयला दिलेल्या जबाब म्हटले आहे.

हेही वाचा - death rate increased : हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूत तिप्पट वाढ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस दलात सामावून घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता, असा दावा परमबीर यांनी केला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मार्च 2021 मध्ये देशमुखांच्या दुष्कृत्यांबद्दल माहिती दिली होती, असेही परमबीर यांनी म्हटले आहे. त्यांचा हा जबाब केंद्रीय अन्वेषण ब्युरोने अनिल देशमुख, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या आरोपी विरोधात विशेष सीबीआय कोर्टात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात आहे.


बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे या प्रकरणात अनुमोदक आहेत. देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. मी मार्च 2021 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेक वेळा भेटलो. मी त्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चुकीच्या कृत्यांची माहिती दिली होती, असे सिंह यांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे. 4 ते 15 मार्च 2021 दरम्यान वर्षा येथे एक बैठक झाली. ज्यामध्ये मी त्यांना गृहमंत्र्यांच्या कृतींबद्दल माहिती दिली, असे परमबीर म्हाणाले.

सिंह म्हणाले की त्यांनी, मार्च २०२१ मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देशमुखांच्या दुष्कृत्यांबद्दल माहिती दिली होती, कारण गृहमंत्री राष्ट्रवादीचे होते आणि राष्ट्रवादीचे प्रमुख म्हणून पवार यांचे त्यांच्यावर नियंत्रण होते. देशमुखांनी केलेल्या गैरकारभाराचा मुद्दा मी अजित पवार, अनिल परब आणि जयंत पाटील यांच्याकडेही मांडला आहे. मुख्यमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांना या गैरप्रकारांची जाणीव होती. त्यांनी शब्दात त्यांच्या माहितीची पुष्टी केली नाही, पण त्यांच्या प्रतिक्रियांवरून मी समजू शकतो की त्यांना आधीच माहित होते, असा जबाब परबीर सिंह यांनी सीबीआयला दिला आहे.


देशमुख सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. मी मुख्यमंत्री, पवार आणि इतर मंत्र्यांना गृहमंत्र्यांच्या गैरप्रकार आणि गैरकृत्यांबद्दल आधीच माहिती दिली होती. त्यामुळेच, गृहमंत्र्यांनी माझ्यावर सूड उगवला आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी माझ्यावर अँटिलिया बॉम्ब प्रकरण तपासात चूक झाल्याचा खोटा आरोप लावला, असेही परमबीर सिंग यांनी म्हटले. त्याचबरोबर, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक सूरज चौहान यांनी आपली भेट घेतली होती आणि सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी दबाव टाकला होता. आदित्य ठाकरेंशी याबद्दल बोललो. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलण्यास सांगितले. जेव्हा मी मुख्यमंत्र्यांशी बोललो तेव्हा त्यांनी मला वाझे यांना पुन्हा कामावर घेण्यास सांगितले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी माझ्यावर टाकलेल्या दबावामुळे वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेमध्ये घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे परमबीर सिंग यांनी म्हटले.

वाझे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, देशमुख यांनी सांगितले होते की मुंबईत 1 हजार 750 बार आहेत आणि त्या प्रत्येकाकडून किमान 3 लाख रुपये जमा झाले तर 40 ते 50 कोटी रुपये जमा झाले पाहिजेत, असे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे. वाझे पुढे म्हणाले की, देशमुख यांनी त्यांना पुन्हा पोलीस दलात सामावून घेण्यासाठी 2 कोटी रुपये देण्यास सांगितले होते. एका बारमालकाच्या म्हणण्यानुसार, वाझे यांनी बारमालकांसोबत झालेल्या बैठकीत पोलीस कारवाईला सामोरे जायचे नसल्यास प्रत्येकाला तीन लाख रुपये द्यावे लागतील, अशी माहिती दिली होती. बारमालकाने सांगितले की वाझेच्या मते, पैसे पोलिसांसाठी आणि नंबर 1 साठी होते. बारमालकाने सीबीआयला सांगितले की मी वाझेला नंबर 1 कोण आहे हे कधीच विचारले नव्हते परंतु सामान्य भाषेत, पोलीस आयुक्तांना पोलीस पदानुक्रमात नंबर 1 मानले जाते, असे बार मालकाने सीबीआयला सांगितले.

देशमुख यांना नंबर 1 हे सांकेतिक नाव दिल्याचे वाझे यांनी सांगितले. सीबीआयच्या आरोपपत्रात इतर अनेक बारमालकांच्या जबाबांचाही समावेश आहे ज्यांनी दावा केला आहे की त्यांना पोलीस कारवाई टाळण्यासाठी वाझेने दरमहा पैसे भरण्यास सांगितले होते. सीबीआय एसीपी संजय पाटील यांच्या वक्तव्यावरही विसंबून राहिली. जेव्हा मी वाझेला विचारले की तो हे असे का करत आहे. वाझे यांनी मला सांगितले की तो नंबर 1 साठी असे करत आहे. मी त्याला विचारले की नंबर 1 कोण आहे तेव्हा त्याने सांगितले की ते पोलीस आयुक्त आहेत. तथापि, वायरलेस कम्युनिकेशनमध्ये सीपी मुंबईचे सांकेतिक नाव किंग आहे, असे संजय पाटील यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबत म्हटले आहे.

हेही वाचा - Minister Eknath Shinde Not Reachable: डझनभर आमदारांसह एकनाथ शिंदेंनी ठोकला गुजरातमध्ये तळ: उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.