ETV Bharat / city

Maharashtra Monsoon Session विरोधकांचे आरोप बिन बुडाचे, मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

author img

By

Published : Aug 16, 2022, 9:34 PM IST

Cm eknath shinde And DCM Devendra Fadnavis
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर हल्लाबोल केला.

मुंबई - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला Maharashtra Monsoon Session उद्यापासून सुरुवात होणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन Maharashtra Monsoon Session आहे. अधिवेशनापूर्वी सत्ताधाऱ्यांकडून आयोजित चहापणाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घालत सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप लावले आहेत. याविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे cm eknath shinde यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत विरोधकांवर प्रतिहल्ला चढवला. हे सरकार जनतेच्या प्रश्नासाठी सक्षम असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत cm eknath shinde Press Conference ते बोलत होते.

हे जनतेच्या मनातले सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे cm eknath shinde म्हणाले, की यावर्षी एकाही तालुक्यात दुष्काळ परिस्थिती नाही. विरोधी पक्षनेते यांनी जे पत्र दिले ते अंतिम आठवडा प्रस्ताव आहे का? असे वाटले. धर्मवीर सिनेमाचा उल्लेख करत एकनाथ कुठे आहे, असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. पण मी तर जागेवरच आहे, असे सांगत त्यांनी अजित पवारांना टोमणा लगावला. शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले पण अमलबजावणी होत नव्हती. अतिवृष्टीमध्ये गडचिरोलीला विमान न गेल्याने आम्ही रस्तामार्गे गेलो. विरोधी पक्षनेते गेले पण तो पर्यंत पूर ओसरला होता. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर नुकसान भरपाईची मदत आपण दुप्पट केली. ती १३ हजार ६०० रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

मागे अजित पवार सरकार चालवत होते आम्ही कुठल्याही कामाला स्थगिती दिली नाही. केंद्रीय पथक राज्यात नुकसानाची पाहणी करून गेले आहे. सरकार अल्पमतात आल्यावर शेवटच्या २ कॅबिनेटमध्ये ३०० ते ४०० शासन निर्णय घेतले, ते चुकीचे होते. म्हणून घाई गडबडीत जे निर्णय घेतले ते थांबवण्यात आले. जलसंपदा विभागात साडेचार हजार कोटींचे निर्णय घेतले. त्यावर चौकशी आढावा घेतला जात आहे. ज्या आवश्यक बाबी आहेत, त्यांना कुठेही स्थगिती नाही. आता जे काम अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवे होते, ते आम्ही आता करत आहोत. बाळासाहेबांच्या विचारातून हे सरकार स्थापन झाले आहे. आमची भूमिका जनतेला पटली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार Opposition Leader Ajit Pawar मागे सरकार चालवत होते. म्हणून त्यांना आता त्रास होणारच आहे. विरोधी पक्षनेते यांना सूचना करण्याचे अधिकार आहेत. एनडीआरएफचे निकष मोदी सरकारनेच २०१५ साली बदलले आहेत. आता इतकी वर्ष झाली आता पुन्हा ते बदलावेत, या साठी समिती गठित केल्याचेही एकनाथ शिंदे cm eknath shinde यांनी स्पष्ट केले.

महविकास आघाडीचे बेईमान सरकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस DCM Devendra Fadnavis म्हणाले, की राज्याचे पावसाळी अधिवेशन Maharashtra Monsoon Session उद्यापासून सुरू होत आहे. नेहमी प्रमाणे त्यांनी चहा पानावर बहिष्कार टाकला आहे. सात पानी पत्र आम्हाला दिले आहे. त्यातील चार पाने आमचीच आहेत. त्यांना विस्मृती झाली आहे, की ते अडीच वर्षे सत्तेत होते. पण काही हरकत नाही. हे बेईमानाने आलेले सरकार आहे, असे ते म्हणतात. पण खरे बेईमान सरकार हे महविकास आघाडीचे सरकार होते. त्यांनीही ३२ दिवसानंतर सरकार स्थापन केले होते. विरोधी पक्षनेता आम्हाला न विचारता केला, यावर काँग्रेसने हरकत घेतली आहे, असेही फडणवीस DCM Devendra Fadnavis म्हणाले.

कुठेही कामांना स्थगिती नाही? ४६ दिवसात लोकांना त्यांचे सरकार दिसत आहे. आता पाय ठेवायला जागा नाही. नैसर्गिक आपत्तीत आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो आहोत. मागच्या सरकारमध्ये नैसर्गिक आपत्तीत जाहीर झालेली मदत ९ महिन्यानंतर जनतेपर्यंत पोहोचली. पण आम्ही ताबडतोब दिली. आम्ही पुनरावलोकन करत आहोत, कुठेही स्थगिती दिली नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा मागचे सरकार अजित पवारच चालवत असल्याने त्यांना आमच्या सरकारचा त्रास होणारचं -मुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.