ETV Bharat / city

CBSE 12th Results 2022 : सीबीएसईचा महाराष्ट्राचा निकाल 90.48 टक्के.. मुलींनी मारली बाजी

author img

By

Published : Jul 22, 2022, 5:48 PM IST

आज सीबीएसईचा ( CBSE Board Result ) निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्राचा निकाल 90.48 टक्के लागला आहे. कोरोनाच्या पहिली टर्ममध्ये ३० टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होती. आताही दुसऱ्या टर्मची परीक्षा ७० टक्के अभ्यासक्रमावर असून दोन्ही टर्म मिळून १०० टक्के सीबीएसई ( CBSE Rrsult ) परीक्षाचा निकाल आज लागला .

CBSE 12th Results 2022
सीबीएसइ निकाल जाहीर

मुंबई - देशभरातील लाखो विद्यार्थी सीबीएसई ( CBSE Board Result ) बारावीचा निकाल कधी जाहीर होतो याची वाट पाहात होते. अखेर आज २२ जुलै २०२२ रोजी सकाळी सीबीएसई बोर्डाकडून बारावीचा निकाल ( Cbse 10th 12th result 2022 ) जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सीबीएसई बारावी बोर्डाचा एकूण निकाल हा 92.71 टक्के असून, महाराष्ट्र राज्याचा निकाल 90.48 टक्के आहे. यामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याचं चित्र निकालात दिसतंय. परीक्षेत 94.54 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या उत्तीर्ण होण्याचा प्रमाण 91.25 टक्के आहे. देशभरात २२ हजार ७३१ शाळा तसेच ७ हजार ४०५ परीक्षा केंद्रात ही परीक्षा झाली. देशभरात एकूण २१ लाख ९ हजार २०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १९ लाख ७६ हजार ६६८ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण देशस्तरावर निकालाची टक्केवारी ९४.टक्के इतकी आहे .

हेही वाचा - Arjun Khotkar : माझा आणि मुख्यमंत्री शिंदेंचा नमस्कार झाला पण...; अर्जुन खोतकरांनी केले स्पष्ट

देशभरातील एकूण १६ विभागात सीबीएसई परीक्षा - त्यापैकी पुणे विभागाचा ९७.४१ टक्केवारीने सहावा क्रमांक अआहे. तर त्रिवेंद्रम विभाग ९९.६८ ,बेंगळूरू ९९.२२ तर चेन्नई ९८.९७ इतका निकाल लागला आहे.

मुलांपेक्षा मुली टक्केवारीत सरस - २०२२ मध्ये एकूण मुलींची निकालाची टक्केवारी ९५.२१ टक्के तरमुलांची टक्केवारी ९३.८० टक्के इतकी आहे. ट्रान्सजेन्डर विद्यार्थ्यांची टक्केवारी ९० टक्के इतकी आहे.

सीबीएसई परीक्षेत अक्षम विद्यार्थ्यांची लक्षणीय संख्या - सीबीएसई परीक्षेत विशेष गरजा असलेल्या मुला मुलींची संख्या यंदा वाढलेली आहे .
मागील वर्षी ५ हजार ३८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ५ हजार ३५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते . यंदा ६ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर त्यापैकी ५ हजार ६५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याच्न्या निकालाची टक्केवारी ९३.४२ टक्के इतकी आहे. याच अक्षम गटात ९० ते ९५ पर्यंत टक्केवारी प्रपात करणारे २९० विद्यार्थी देश स्तरावर आहेत. तर ६३ विद्यार्थी असे आहेत ज्यांनी ९५ टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले आहेत. अशी माहिती सीबीएसई मंडळ परीक्षा नियंत्रक सन्याम भारद्वाज दिल्ली यांनी ई टीव्ही भारतला सांगितले .

शामली येथील दिया देशात अव्वल - CBSE बोर्डाने शुक्रवारी 12वी आणि 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. दुसरीकडे, शामली जिल्ह्यातील स्कॉटिश इंटरनॅशनल स्कूलची 10वीची विद्यार्थिनी दिया नामदेव 100% गुण मिळवून राष्ट्रीय टॉपर बनली आहे. दिया नामदेव हिने 10वीच्या परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवत देशात अव्वल क्रमांक पटकवला आहे.

मे-जून मध्ये झाली होती परीक्षा - कोविड-19 संसर्गामुळे यावर्षी बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली होती. ज्यामध्ये पहिल्या टर्मची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात तर दुसऱ्या टर्मची परीक्षा मे-जूनमध्ये घेण्यात आली होती.

हेही वाचा - Aditya Thackeray Aurangabad Visit: बंडखोर आमदार विरोधात आदित्य ठाकरे करणार सेनेचे शक्तिप्रदर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.