ETV Bharat / city

Raj Thackeray : राज्यात अजूनही बालमजुरी सुरू; चौकशी करण्याची सरकारकडे मागणी

author img

By

Published : Sep 23, 2022, 1:23 PM IST

Raj Thackeray
राज ठाकरे

शाळाबाह्य विद्यार्थी, बालविवाह, कुपोषण यानंतर राज्यात आता वेठबिगारी सारखा गंभीर मुद्दा समोर (child labour still continues in state) येतोय. मागील काही दिवस विदर्भ दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भात सरकारला व जनतेला खरमरीत पत्र लिहिल्याने यावर पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चा सुरू झाल्या (Raj Thackeray instruction to goverment to inquire) आहेत.

मुंबई : शाळाबाह्य विद्यार्थी, बालविवाह, कुपोषण यानंतर राज्यात आता वेठबिगारी सारखा गंभीर मुद्दा समोर (child labour still continues in state) येतोय. मागील काही दिवस विदर्भ दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भात सरकारला व जनतेला खरमरीत पत्र लिहिल्याने यावर पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चा सुरू झाल्या (Raj Thackeray instruction to goverment to inquire) आहेत. राज्यातील काही भागांत लहान मुलांना वेठबिगारी करावी लागत असल्याचा गंभीर मुद्दा राज ठाकरे यांनी आपल्या पत्रातून उपस्थित केला आहे.


काय म्हटलंय राज ठाकरे यांनी ? सरकारला लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात की, गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण (child labour Raj Thackeray) आहे.


चौकशीचे निर्देश द्या - आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही. राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकार्‍यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला (child labour goverment to inquire) हवं.



तर महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील - राज ठाकरे पुढे म्हणतात की, पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले, तर तुम्ही पोलिसांची तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील. ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.