ETV Bharat / city

Congress Leaders Meet CM Thackeray : निधी वाटपात स्वतः लक्ष घालण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - नाना पटोले

author img

By

Published : Feb 17, 2022, 9:09 PM IST

महाविकास आघाडी सरकारमधील निधी वाटपासह इतर विषयांसाठी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट ( Congress Leaders Meet CM Thackeray ) घेतली. यावेळी निधी वाटपामध्ये स्वतः लक्ष घालणार ( Chief Ministers intervention in allocation of funds ) असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी दिल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी दिली.

निधी वाटपात स्वतः लक्ष घालण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - नाना पटोले
निधी वाटपात स्वतः लक्ष घालण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - नाना पटोले

मुंबई - काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांची भेट घेऊन निधी वाटपासह महत्वाच्या विषयांवर चर्चा ( Congress Leaders Meet CM Thackeray ) केली. काँग्रेसने उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री सकारात्मक असून, निधी वाटपात स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले ( Chief Ministers intervention in allocation of funds ) आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी दिली.

काँग्रेसच्या दिग्गजांची उपस्थिती

काँग्रेस शिष्टमंडळाने आज सायंकाळी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे आदी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्षपदाबाबत चर्चा

आम्ही मुख्यमंत्र्यांच्या प्रकृत्तीची विचारपूस केली, मुख्यमंत्र्याची प्रकृत्ती आता चांगली आहे. महाविकास आघाडी सरकारने दोन वर्ष पुर्ण केलेली आहेत या दोन वर्षाच्या काळातील कामकाजाबाबत काही सुचना आम्ही मुख्यमंत्री महोदयांना केल्या. ग्रामीण भागात महावितरण कडून विजेची कनेक्शन्स कापली जात आहेत. त्याबाबतही चर्चा केली, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतही चर्चा झाली. खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप गंभीर असून, त्याची चौकशी करावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे पटोले यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

सोमय्यांचा एकही आरोप सिद्ध नाही

किरीट सोमय्या यांनी आतापपर्यंत लावलेल्या आरोपातील एकही आरोप सिद्ध झाला नाही. महाराष्ट्राचा विकास होऊ नये यासाठी भाजप काम करत आहे. सोमय्या पुन्हा कोर्लई गावात जातील आणि पुन्हा तेथील काही लोक त्यांना विरोध करतील, यातून वातावरण अशांत करण्याचा सोमय्या यांचा प्रयत्न आहे, असेही पटोले म्हणाले.

हिजाब नाही हिशेब देण्याची वेळ झाली

देशात महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था शेतकरी, कामगारांच्या समस्यांसह अनेक महत्वाच्या समस्या असताना भाजपाकडून जाणीवपूर्वक हिजाबचा मुद्दा उपस्थित करुन वातावरण बिघडवण्याचे काम केले जात आहे. आता ‘हिजाब’चा नाही देशाला ‘हिशोब’ देण्याची वेळ आहे, तो ‘हिशोब’ द्या, असे पटोले यांनी सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.