ETV Bharat / city

BMC Election : मुंबई मनपा निवडणुकीत महाविकास आघाडीची शक्यता कमी; 'हे' आहेत त्यामागचे कारणे

author img

By

Published : Oct 10, 2022, 5:55 PM IST

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दीड ते दोन महिन्यात होण्याची शक्यता ( Mumbai Municipal Election )आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी बाबत लवकरच बैठक पार पडणार ( Chances are low of Mahavikas Aghadi in Mumbai Municipal Election ) आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Mumbai Municipal Election
Mumbai Municipal Election

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दीड ते दोन महिन्यात होण्याची शक्यता ( Mumbai Municipal Election )आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी बाबत लवकरच बैठक पार पडणार ( Chances are low of Mahavikas Aghadi in Mumbai Municipal Election ) आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महाविकास आघाडीची शक्यता कमी

तिन्ही पक्षाचा पाठबळ मिळणार : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असून यामध्ये उद्धव ठाकरे गटांचे उमेदवार ऋतुजा लटके यांना तिन्ही पक्षाचा पाठबळ मिळणार आहे. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात (Congress leader Meet Uddhav Thackeray on Matoshree ) आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतेमंडळींनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत पाठिंबा दर्शवला आहे. अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी झाली असली तरी, होऊ घातलेल्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नेमकं काय? अद्यापही महाविकास आघाडी कडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. खास करून मुंबई महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडी होणार का ? हा प्रश्न देखील अद्याप अनुत्तरीत आहे.

आघाडीची शक्यता कमी : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील दीड ते दोन महिन्यानंतर होण्याची शक्यता आहे. अवघ्या देशभराचे लक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुकांवर आहे. गेली 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला यावेळीही आपली सत्ता मुंबई महानगरपालिकेवर टिकवण्याचं आवाहन असेल. तर दुसरीकडे पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाने केला आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे रणनीती आखली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते मुंबई महानगरपालिकेसाठी अनेक बैठका घेत आहेत. त्यातच शिवसेनेमध्ये पडलेली उभ्या फुटीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या यंदा होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळेल का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागले आहेत.

राजकीय वर्तुळातील कयास : त्यामुळेच यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र मिळून निवडणूक लढवतील असे कयास राजकीय वर्तुळात लावले जात आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडी होणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस हे एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. कारण दोन्हीही पक्ष हे मुंबईत प्राबल्य असलेले पक्ष आहेत. त्यामुळे 227 नगरसेवक जागा असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपाचा तिढा या दोन्ही पक्षासमोर असणार आहे. वर्षानुवर्ष शिवसेना आणि काँग्रेस विरोधात लढत आले असल्यामुळे जागा वाटपाचा तिढा मुंबई महानगरपालिकेत सुटणं कठीण असल्याचं मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो व्यक्त करतात.

छुपी युतीची शक्यता : शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये जागा वाटपामुळे मुंबई महानगरपालिकेत युती होणे शक्य नाही. मात्र मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचा प्राबल्य वाढत आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य असेल. त्या ठिकाणी मात्र काँग्रेस सोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाची छुपी युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी काही प्रमाण दोन्ही पक्ष ठरवतील. ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक असलेल्या मतदार संघात दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार कोणत्या पक्षाचा होता. त्या मतदाराला किती मते पडली आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षाला किती मते पडली याचं सूत्र जमवल्यानंतरच ही छुपी युती मुंबईच्या काही मतदारसंघात केली जाण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

थेट युतीची शक्यता : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईत फारशी ताकद नाही. यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई महानगरपालिकेमध्ये केवळ आठ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र असं असलं तरी मुंबईच्या अनेक भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच यावेळी ची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना उद्धव ठाकरे गट यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत थेट युती करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मआविच्या नेत्यांची बैठक होणार : राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीची एकही बैठक झालेली नाही. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाविकास आघाडीची ही बैठक पार पडणार होती. मात्र काही कारणास्तव ही बैठक पार पडू शकली नाही. पण पुढील आठवड्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांवर चर्चा होऊन स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा केली जाईल आणि त्यानंतर आघाडी बाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. याच बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत देखील चर्चा होईल. आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असून पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी बाबत चर्चा होणार असल्याची माहिती दिली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक : तर तेथेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनीही मुंबई महानगरपालिका आणि होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडेल. या बैठकीतूनच होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी नेमकी काय रणनीती ठरवणार याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे. शिवसेना ९५, भाजप ८२, काँग्रेस २९, एनसीपी ८, समाजवादी ६, मनसे १, एम आय एम २ उमेदवार रिंगणात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.