मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने तपास केला होता. त्या तपासाचे गोपनीय कागदपत्रे लीक (Inquiry Documents leak) झाले होते. त्या प्रकरणी सीबीआयने तपास (CBI) सुरू केला होता. त्या प्रकरणात सीबीआय अधिकाऱ्यांसह अनिल देशमुख यांचे वकील आनंद डाग यांना देखील अटक केली होती. आता या प्रकरणात सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयामध्ये अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे (Sanjiv Palande) आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांची चौकशी करण्याकरिता अर्ज दाखल करण्यात आला होता. हा अर्ज न्यायालयाने आज मंजूर केला असून, आर्थर रोड जेलमध्ये दोघांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची अडचण अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या खळबळजनक आरोपानंतर माजी गृहमंत्री देशमुख अडचणीत आले आहेत. गोपनीय कागदपत्रे लीक प्रकरणी सीबीआयने नुकतेच अनिल देशमुखांच्या काही ठिकाणांवर छापेही टाकले होते. केंद्रीय तपास यंत्रणेने देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील काही ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांचा शोध घेण्यात आला होता. 2 सप्टेंबर रोजी तपास यंत्रणेने देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अटक केली होती. आता काही दिवसांपूर्वीच आनंद डागा यांना जामीन मिळाला आहे.
नेमके प्रकरण काय?
100 कोटींच्या वसुलीचे आरोप अनिल देशमुख यांच्यावर होते. त्या प्रकरणी ईडी आणि सीबीआय यांच्याकडून चौकशी केली जात आहे. देशमुख यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली. जून, जुलै आणि ऑगस्ट 2021 या महिन्यात ईडीने विविध ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर त्यांचे सचिव संजीव पलांडे यांनाही अटक केली. तसंच कुंदन शिंदे यांनाही अटक केली.
मार्च महिन्यात जेव्हा परमबीर सिंग यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आलं त्यानंतर तीन दिवसात परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला 100 कोटी रुपये दर महिन्याला बार आणि रेस्टॉरंटमधून वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं.