ETV Bharat / city

BJP vs BMC : भ्रष्टाचारी कार्यपद्धती न अवलंबता ते प्रस्ताव रद्द करा; भाजपाची आयुक्तांकडे मागणी

महापालिकेचा कार्यकाळ संपताना स्थायी समितीने १२३ प्रस्तावांना मंजुरी न देता ते राखून ठेवले. पालिकेचा कार्यकाळ संपल्यावर आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. यामधील काही प्रस्ताव मंजूर केले असले तरी बहुसंख्य प्रस्तावांना मंजुरी दिलेली नाही. सत्ताधारी सेनेच्या भ्रष्टाचाराला साजेल अशी पुरक कार्यपद्धती अवलंबू नये. अशी मागणी भाजपाने पालिका आयुक्तांकडे केली आहे.

मुंबई महानगरपालिका  (फाईल फोटो)
मुंबई महानगरपालिका (फाईल फोटो)
author img

By

Published : Apr 10, 2022, 12:02 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपताना स्थायी समितीने १२३ प्रस्तावांना मंजुरी न देता ते राखून ठेवले. पालिकेचा कार्यकाळ संपल्यावर आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. यामधील काही प्रस्ताव मंजूर केले असले तरी बहुसंख्य प्रस्तावांना मंजुरी दिलेली नाही. सत्ताधारी सेनेच्या भ्रष्टाचाराला साजेल अशी पुरक कार्यपद्धती अवलंबू नये. प्रस्तावांमध्ये अवैधता आढळत असेल तर आपण संपूर्णपणे त्याला नामंजूर करावे अशी मागणी भाजपाने पालिका आयुक्तांकडे केली आहे. तसे पत्र भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.

पालिका आयुक्तांना पत्र - मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यात निवडून आलेल्या नगरसेवकांचा कालावधी (७ मार्च २०२२)रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे महापालिका बरखास्त झाली आहे. महापालिका संपुष्टात आल्याने यापूर्वीच्या स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आले.

नालेसफाई आणि चर बुजवण्याचे काम - यावेळी मात्र, समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांचे कामकाज पहाणारे विमल अगरवाल यांची कंत्राटदारांशी बोलणी फिस्कटल्याने काही प्रस्ताव विचारात घेतलेले नाही, असे एकूण १२३ प्रस्ताव होते. सदरचे प्रस्ताव मंजूर करणे हे आता प्रशासकाच्या अखत्यारित आहेत. तथापि आपण यावर ठोस निर्णय घेताना दिसला नाही. भाजपने नालेसफाईच्या कामांबाबत तीव्र टीका केल्यानंतर आपण २५ दिवसांनी नालेसफाई आणि चर बुजवण्याच्या कामांचे प्रस्ताव समंत केले असे शिंदे यांनी म्हटले आहे.

ते प्रस्ताव रद्द करावेत - त्यानंतर बुधवार दिनांक (६ एप्रिल २०२२)रोजी आठ प्रस्तावांना मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे. परंतु, आपण स्वत: आयुक्त आहात आणि प्रशासकही आपणच आहात. स्थायी समितीने बोलणी फिसकटलेले प्रस्ताव आपण निवडक पद्धतीने मंजूर करत आहात त्यामुळे मागे सत्तेत असणाऱ्या भ्रष्टाचारी सेनेचा आपल्यावर दबाव तर नाही ना अशी आमची धारणा होत आहे असही म्हटले आहे.

भ्रष्टाचाराला साजेल अशी पुरक कार्यपद्धती अवलंबू नये - परंतु, तरीही काही निवडक प्रस्तावांनाच आपण मान्यता देण्याच्या आपल्या कार्यपद्धतीमुळे आपली प्रतिमासुद्धा मलीन होत आहे. आपल्याला प्रलंबीत १२३ प्रस्तावांमध्ये अवैधता आढळत असेल तर आपण संपूर्णपणे त्याला नामंजूर करावे. कुठल्या परिस्थितीत निवडक प्रस्तावांना मान्यता देऊन मागील सत्ताधारी सेनेच्या भ्रष्टाचाराला साजेल अशी पुरक कार्यपद्धती अवलंबू नये असे शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा - मुंडेनंतर गणेश नाईक! महिलेचे नाईक यांच्याविरोधात गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.