ETV Bharat / city

Goa Assembly Elections 2022 : गोयंकारांनो हांव आयलो तुमका मेळपाक, शिवसेनेची गोवेकरांना साद

author img

By

Published : Feb 11, 2022, 7:09 AM IST

गोवा विधानसभा निवडणूकीत शिवसेनेकडून प्रचार सुरू होणार आहे. (Campaign by Shiv Sena In Goa Assembly Election 2022) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उद्यापासून गोव्याच्या दौऱ्यावर असून गोयंकारांनो हांव आयलो तुमका मेळपाक, अशी साद घातली आहे. शिवसेनेला गोयंकर साथ देतील का, हे चित्र मात्र निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.

शिवसेनेच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे गोवा दौऱ्यावर
शिवसेनेच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे गोवा दौऱ्यावर

मुंबई - गोवा राज्याच्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेकडून प्रचार सुरू होणार आहे. (Goa Assembly Elections 2022 ) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उद्यापासून गोव्याच्या दौऱ्यावर असून गोयंकारांनो हांव आयलो तुमका मेळपाक, अशी साद घातली आहे. शिवसेनेला गोयंकर साथ देतील का, हे चित्र मात्र निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.

Aditya Thackeray on Goa Visit
शिवसेनेच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे गोवा दौऱ्यावर

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षात अस्तित्वाची लढाई

महाराष्ट्राच्या शेजारील गोवा राज्यात कोंकणी आणि मराठी माणसाचा वास्तव्य आहे. (Campaign by Shiv Sena In Goa) हिंदुत्वाचा मुद्दा आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी झटणाऱ्या शिवसेनेने आत्तापर्यंत गोव्यात कधीही पाऊल ठेवले नव्हते. शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षात अस्तित्वाची लढाई सुरू झाले आहे. भाजपला शह देण्यासाठी आता शिवसेनेनेही कंबर कसली आहे.

घरोघरी जाऊन पक्ष प्रचार करण्यावर भर

येत्या १४ फेब्रुवारीला गोव्यात मतदान होत आहे. (Aditya Thackeray on Goa Visit) विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला अवघ्या चार दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे प्रचाराला वेग आला असून भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, आप आणि तृणमूल कॉंग्रेससह विविध राजकीय पक्षांचे नेते घरोघरी जाऊन पक्ष प्रचार करण्यावर भर देत आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने ९ उमेदवारांची यादी आज जाहीर केली. एकूण १० ते १२ जागांवर शिवसेना निवडणूक लढवणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर निवडणुकीसाठी प्रमुख प्रचाराची धुरा

शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर निवडणुकीसाठी प्रमुख प्रचाराची धुरा असून ते उद्यापासून मैदानात प्रचाराला उतरत आहेत. वास्को, पेडणे, साखळी येथे सभा घेऊन शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, उदय सामंत, माजी मंत्री दिवाकर रावते या आक्रमक नेत्यांची फौज आदित्य ठाकरे यांच्या सोबत प्रचारात उतरणार आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेची घेतलेली भूमिका निवडणूक महत्त्वाची मानली जाते. गोयंकर शिवसेनेला साथ देणार का, हे आता पाहावे लागणार आहे.

हेही वाचा - Unique Garage In Kolhapur : या गॅरेजमध्ये "गतिमंद" कामगारांची "गती" बघून व्हाल हैराण, वाचा प्रेरणादायी कहाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.