मुंबई मुंबईतील परळ येथील लाल मैदानात कंबोडियाच्या विष्णू मंदिराची Cambodia Vishnu temple built in Parel प्रतिकृती उभी राहते आहे. या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन दिवसात गणेश भक्तांना या मंदिराचे दर्शन घेता येणार आहे. लाखो रुपये खर्च करून, दरवर्षी परळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे Public Ganeshotsav Mandal, भाविकांसाठी वेगवेगळ्या मंदिरांचा देखावा सादर केला जातो.Ganeshotsav 2022
मुंबईतील परळ आणि लालबाग हा विभाग सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अतिशय महत्त्वाचा आणि सुप्रसिद्ध असा आहे. गणेशोत्सवा दरम्यान गणरायाच्या दर्शनासाठी मुंबई भरातील लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. लालबाग आणि परळ, गणेशोत्सवासाठी अतिशय प्रसिद्ध असून परळच्या विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मोठमोठे देखावे उभारले जातात. यात परळच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे उभारले जाणारे मंदिरांचे देखावे हे अतिशय आकर्षक आणि भाविकांना आकृष्ट करणारे ठरतात.
यावर्षी परळच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कंबोडियातील विष्णू मंदिराचा देखावा साकारण्याचा निर्णय घेतला आहे.
कंबोडियाचे विष्णू मंदिर दरवर्षी राज्यातील अथवा राज्याबाहेरील मंदिरांची प्रतिकृती आमच्या मंडळामार्फत केली जाते. या ठिकाणी येणारे भाविक हे गणरायाच्या दर्शनासाठी जरी येत असतात. हे भाविक राज्यातील मोठमोठ्या देवस्थानांकडे अथवा राज्याबाहेरील देवस्थानांना भेटी देण्यासाठी कित्येकदा जाऊ शकत नाहीत, अशा भाविकांसाठी या सुप्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती तयार करणे आणि त्यांना अशा मंदिरांचे आणि देवतांचे दर्शन घडवणे, हाच आमच्या मंडळाचा हेतू असतो, अशी माहिती मंडळाचे कार्यकर्ते साहील सावंत यांनी दिली आहे. तसेच प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या मंदिरांची प्रतिकृती उभारली जात असल्याने, आमच्या मंडळाला भाविक दररोज हजारोंच्या संख्येने भेट देतात आणि गणेशोत्सवा दरम्यान परळ परिसर त्यामुळे भाविकांनी फुलून गेलेला असतो, असेही सावंत यांनी सांगितले.
मंदिरांची प्रतिकृती उभारण्यासाठी लक्षावधीचा खर्च लाल मैदान परळ येथे यंदा कंबोडियाच्या विष्णू मंदिराची प्रतिकृती उभी राहते आहे. या ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिस चा वापर करून अतिशय सुबक असे मंदिर निर्माण केले जात आहे. प्रत्यक्ष मंदिरावर असलेले कोरीव काम आणि कलाकुसर या ठिकाणीही पाहायला मिळते आहे. कंबोडियाच्या विष्णू मंदिराची हुबेहूब प्रतिकृती भाविकांना यंदा लाल मैदान परिसरात पाहायला मिळणार आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी नऊ ते दहा लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती, सावंत यांनी दिली.
लाल मैदानाची मंदिरांची परंपरा लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सवामार्फत आतापर्यंत तुळजापूर मंदिर, बद्रीनाथ मंदिर, माहूरचे मंदिर, तसेच राज्यातील आणि राज्याबाहेरील अनेक मंदिरांची निर्मिती करण्यात आली आहे. या मंदिरांचा निर्मितीसाठी गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी विशिष्ट रक्कम ठरवली जाते. त्यामुळे भाविकांसाठी दरवर्षी सुप्रसिद्ध मंदिर पाहण्याची संधी या मंडळातर्फे दिली जाते, यंदाही भाविकांना कंबोडियाच्या विष्णू मंदिराच्या माध्यमातून मंदिराचे दर्शन घेता येणार आहे.Ganeshotsav 2022
हेही वाचा Chakardhar swami 2022 चक्रधर स्वामींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा