ETV Bharat / city

Breaking - महाराष्ट्र एटीएसने मुंब्रातून एकाला केली अटक

author img

By

Published : Sep 22, 2021, 7:53 AM IST

Updated : Sep 22, 2021, 10:37 PM IST

Breaking News  - 5 kg of heroin seized at Mumbai airport
Breaking - मुंबई विमानतळावर जबरदस्त कस्टम कारवाई, 5 किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त

22:36 September 22

महाराष्ट्र एटीएसने मुंब्रातून एकाला केली अटक

महाराष्ट्र एटीसएसने उत्तर प्रदेश एटीएस प्रमुखांच्या विनंतीवरून मुंब्रा येथून अब्दुल रज्जाक मेमनला अटक केली आहे. त्याच्यावर एक लाखांचे इनाम होते. त्याच्याविरोधात लखनौमध्ये एका गुन्ह्याची नोंद होती. यासंदर्भात उत्तर प्रदेश एटीएसने त्याच्याविरोधात लूट आऊट नोटीस बजावलेली होती.

22:30 September 22

उत्तर प्रदेश एटीएसने मुंब्र्यातून एकाला घेतले ताब्यात

उत्तर प्रदेश एटीएस मुंब्र्यात दाखल झाले आहे. मुंब्र्यातील सम्राट नगर मधील आनंद नगर सोसायटीतून एटीएसने एकाला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीला कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्याची सध्या मुंब्रा पोलीस ठाण्यात युपी एटीएसकडून चौकशी केली जात आहे.

19:26 September 22

आगामी महापालिका निवडणुकीसाठी बहुसदस्य प्रभाग पद्धतीचा निर्णय

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीसाठी बहुसदस्य प्रभाग पद्धतीचा निर्णय. मुंबईत १ वॉर्ड पद्धती. उर्वरित महापालिकेत ३ सदस्यीय प्रभाग, तर नगरपालिका व नगर परिषदेत २ सदस्यीय प्रभाग. 

19:24 September 22

सहकार विभागाच्या वतीने साखर संकुलात संग्रहालय उभारणार - मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई - आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात सहकार विभागाच्या वतीने साखर संकुलात संग्रहालय उभारणार, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. 

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  • भिवंडी - निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विकास योजनेमध्ये फेरबदल करण्यास मान्यता.
  • प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अल्पसंख्याक उमेदवारांकरिता निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्ग योजना राबविणार.
  • महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये एकसदस्यीय प्रभाग पद्धती ऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत.
  • नागरी स्थानिक संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात प्रमाण निश्चिती. अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय.
  • महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या विकासाची वाटचाल मांडण्यासाठी साखर संग्रहालय उभारणार.
  • सहकारी सुतगिरणी आकृतिबंधातील मानव विकास कमी असणाऱ्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्यांच्या समावेशाची अट रद्द करण्याचा निर्णय.
  • महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ६५ कलम ७५ व कलम ८१ मध्ये दुरुस्ती करण्यास मान्यता.
  • कापूस पणन महासंघाद्वारे २०२० - २१ च्या हंगामात हमीभावाने खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यासाठी अतिरिक्त ६०० कोटींच्या कर्जास शासन हमी.
  • गाळप हंगाम २०२१ - २२ करिता सहकारी साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्जास शासन थकहमी देणार.
  • महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मध्ये सुधारणा.
  • रत्नागिरी जिल्ह्यातील अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्प पाचव्या सुधारीत प्रशासकीय मान्यता.

18:45 September 22

मंजूर पदांचा आढवा घेऊन मागणीपत्र तात्काळ एमपीएससीकडे पाठवा, मुख्यमंत्र्यांचे विभागांना निर्देश

मुंबई -  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीसाठी काही विभागांकडून मागणीपत्र आयोगाला अद्याप सादर केलेले नाही. याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत सर्व विभागांनी मंजूर पदांचा आढावा तात्काळ घेऊन आपले मागणीपत्र आयोगाकडे पाठवावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सचिवांना निर्देश देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील तातडीने ही कार्यवाही झाली पाहिजे, अशी सूचना दिली. 

16:01 September 22

ठाणे ते नाशिक आणि घोडबंदर ते नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे - ठाणे ते नाशिक आणि घोडबंदर ते नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. 10 ते 15 किलोमीटर पर्यंत रांग आहे. गेल्या 3 तासांपासून वाहतूक कोंडी आहे. सतत पडणारा पाऊस, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.

14:02 September 22

महापालिका मुख्यालयात भाजपकडून निदर्शने

मुंबई - महापालिका मुख्यालयात भाजपकडून निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी पत्रकारांना पालिकेच्या सभांना प्रवेश द्या अशी मागणी करण्यात आली. ऑनलाईन बैठकांमध्ये नगरसेवकांना बोलू दिले जात नाही, त्यामुळे दोन लस घेतलेल्या नगरसेवकांच्या उपस्थितीत पालिकेच्या सभा घ्याव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. काल बेस्टमध्ये भाजपा सदस्यांना बोलू न देता तिकीट प्रणालीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्या विरोधात आंदोलन करणार असून, आम्ही कोर्टात जाऊ असा इशाराही भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी यावेळी दिला आहे.

13:59 September 22

Breaking - अनिल परब यांची किरीट सोमैयांच्या विरोधात न्यायालयात धाव

मुंबई - किरीट सोमैया यांनी केलेल्या आरोपांविरोधात आम्ही न्यायालायत धाव घेतली आहे. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही म्हणून मी न्यायमूर्तींकडे मदतीसाठी गेलो आहे. न्यायमूर्ती मला न्याय देतील असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला आहे.

13:57 September 22

ओबीसींचा आरक्षण टिकवण्याचे काम हे केंद्र सरकारच्या हातात -डॉ. बबनराव तायवाडे

ओबीसींचा आरक्षण टिकवण्याचे काम हे केंद्र सरकारच्या हातात असल्यामुळे सध्या राज्य सरकारने नेमलेले राज्य मागासवर्गीय आयोग आणि त्यामार्फत केले जात असलेल्या प्रयत्नातून काहीच साध्य होणार नाही. त्यामुळेच राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदावरून राजीनामा दिल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. ओबीसींचे 27 टक्के आरक्षण वाचवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी ही त्यांनी केली. आज नागपूरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आंदोलन केले.

12:51 September 22

Breaking - भाजपा नेते किरीट सोमैया यांची मुलुंड पोलिसांविरोधात तक्रार

मुंबई - किरीट सोमैया यांनी मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि एसीपी त्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. 19 तारखेला मुंबई पोलिसांनी बेकायदेशीररित्या घरामध्ये सहा तास मला स्थानबद्ध करून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चोवीस तासांमध्ये मुंबई पोलिसांनी माझी माफी मागावी अन्यथा, कायदेशीर कारवाईला सामोरे जावे अस भाजपा नेते किरीट सोमैया म्हणाले आहेत. नवघर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्यानंतर ते बोलत होते.

12:50 September 22

Breaking - गंगापूर पाण्याचा विसर्ग वाढवणार

नाशिक -

गंगापूर धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने, धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्या टप्याने वाढविण्यात येणार आहे.

12:46 September 22

Breaking - पालघरमध्ये दमदार पाऊस, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

पालघर - पालघरमध्ये पावसाची दमदार हजेरी, डहाणू-जव्हार-नाशिक मार्गावरील चारोटी येथील पूल पाण्याखाली गेला आहे.  डहाणू-कासा मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

10:01 September 22

दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल सक्रीय राजकारणात येण्याचे संकेत

गोवा - दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल सक्रीय राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत मिळत आहेत. उत्पल हे आगामी गोवा विधानसभा निवडणूक लढणार आहेत. गोव्याची राजधानी पणजीतून उत्पल निवडणूक लढविणार असल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून उत्पल पर्रीकर हे अज्ञातवासात होते. दरम्यान, भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. 

09:11 September 22

Breaking - राज्यपालांना स्वाक्षरी करण्यात अडचण काय? हे भाजपने सांगितले पाहिजे -राऊत

नवी दिल्ली - राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी स्वाक्षरी का करत नाहीत, याचे उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यावे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच, राज्यपालांना स्वाक्षरी करण्यात काय अडचण आहे, हे भाजपने सांगितले पाहिजे असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.  

09:06 September 22

Breaking - राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार

Breaking - राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार 

07:45 September 22

Breaking - मुंबई विमानतळावर जबरदस्त कस्टम कारवाई, 5 किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त

मुंबई विमानतळावर जबरदस्त कस्टम कारवाई, 5 किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त, कस्टम विभागाने 2 विदेशी महिलांना ड्रग्जसह अटक केली, बॅगमध्ये लपवून ड्रग्ज घेऊन जात होत्या, जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत 25 कोटी रुपये आहे, ज्युडिसिल कस्टडी 14 दिवसांसाठी पाठवली आहे.

Last Updated :Sep 22, 2021, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.