ETV Bharat / city

Breaking : दहावी-बारावीच्या परीक्षांची तारीख ठरली, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांनी केले वेळापत्रक जाहीर

author img

By

Published : Dec 16, 2021, 7:34 AM IST

Updated : Dec 16, 2021, 6:02 PM IST

Breaking : होम क्वारंटाइनच्या नियमांचं अभिनेत्री आलीया भटकडून उल्लंघन, कामानिमित्त गेली दिल्लीला
Breaking : होम क्वारंटाइनच्या नियमांचं अभिनेत्री आलीया भटकडून उल्लंघन, कामानिमित्त गेली दिल्लीला

18:00 December 16

दहावी-बारावीच्या परीक्षांची तारीख ठरली, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांनी केले वेळापत्रक जाहीर

  • दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रक जाहीर
  • दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान
  • बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होईल

17:49 December 16

परमबीर सिंग खंडणी प्रकरणातील फरार आरोपी विनय सिंगला अटक

  • मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने फरार आरोपी विनय सिंगला अटक केली आहे
  • मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या खंडणी प्रकरणात विनय सिंग आरोपी आहे
  • खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता विनय सिंग
  • फरार आरोपी विनय सिंगला आज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली

13:44 December 16

नांदगांवचे माजी आमदार संजय पवार यांचा भाजपाला रामराम

नांदगांवचे माजी आमदार संजय पवार यांचा भाजपाला रामराम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

माजी आमदार पंकज भुजबळ देखील उपस्थित राहणार

12:23 December 16

बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळताच कोल्हापुरात शेतकऱ्यांकडून जल्लोष

*कोल्हापूर फ्लॅश*

राज्यात बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळताच कोल्हापुरात शेतकऱ्यांकडून एकच जल्लोष

कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावर सर्व शेतकरी एकत्र

गुलालाची उधळण करत आणि घोषणाबाजी करत जल्लोष साजरी

12:20 December 16

बैलगाड्यांच्या शर्यतीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी

बैलगाड्यांच्या शर्यतीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी

11:31 December 16

वसईतील शास्त्रीकर पाडा येथील परफ्यूम आणि प्लास्टिक कंपनीला भीषण आग

वसईतील शास्त्रीकर पाडा येथील परफ्यूम आणि प्लास्टिक कंपनीला भीषण आग. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी हजर आहेत. अद्याप कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

08:23 December 16

ओमीक्रॉनचा उस्मानाबाद जिल्ह्यात संसर्ग, 2 रुग्ण आढळले

ओमीक्रॉनचा उस्मानाबाद जिल्ह्यात संसर्ग, 2 रुग्ण आढळले - चिंता वाढली

युएईहुन बावी येथे आलेला रुग्ण ओमीक्रॉन पॉझिटिव्ह आल्याने खळबळ - बावीत कलम 144 लागू

07:25 December 16

Breaking : होम क्वारंटाइनच्या नियमांचं अभिनेत्री आलीया भटकडून उल्लंघन, कामानिमित्त गेली दिल्लीला

होम क्वारंटाईनच्या नियमांचं अभिनेत्री आलीया भटने उल्लंघन केले आहे. काही कामानिमित्त ती दिल्लीला गेली आहे. आलीया भट हाय रिस्क रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे बीएमसी ने ७ दिवसांचे होम क्वारंटाईनचे बंधन घातले होते मात्र, ५ दिवसांनंतरच आलीया भट दिल्लीत पोहोचली. आपण एका दिवसाच्या कामाकरता दिल्लीला जात असून आपला कोविड रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे आलियाने पालिकेला कळवले आहे.

Last Updated :Dec 16, 2021, 6:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.