ETV Bharat / city

Singer Rahul Jain Case : बॉलीवूड गायक राहुल जैनची मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव

author img

By

Published : Oct 1, 2022, 7:05 AM IST

बॉलीवूड बॉलीवूड गायक राहुल जैन ( Bollywood singer Rahul Jain ) विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा ( Sexual assault case against singer Rahul Jain ) दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गायक राहुल जैनने मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) अटकपूर्व जामीन ( Singer Rahul Jain pre arrest bail ) अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 3 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

Singer Rahul Jain Case
गायक राहुल जैन

मुंबई - बॉलीवूड मधील संगीत दिग्दर्शक, गायक राहुल जैनच्या ( Singer Rahul Jain ) विरोधात कस्टम डिझायनर महिलेने लैंगिक अत्याचाराचा गुन्हा ( Sexual assault case against singer Rahul Jain ) उशिरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गायक राहुल जैनने मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) अटकपूर्व जामीन ( Singer Rahul Jain pre arrest bail ) अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 3 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता - गायक राहुल जैन ( Bollywood singer Rahul Jain ) दिंडोशी येथील सत्र न्यायालयाने 7 सप्टेंबर रोजी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता त्यावेळी न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले होते की, एफआयआरमध्ये प्रथमदर्शनी गंभीर गुन्हा केला होता. कॉस्ट्यूम डिझायनरनचा मुंबईच्या उपनगरातील लोखंडवाला येथे राहत्या घरी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर जैन यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. ओशिवरा पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता.सत्र न्यायाधीश ए झेड खान यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर तसेच पोलीस, महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त सरकारी वकील सौ. गीता गोडांबे यांनी अटकपूर्व जामीन देण्यास विरोध केला होता.

गायकाविरुद्ध गेल्या 12 महिन्यांतील हा दुसरा एफआयआर - पीडित तरुणीच्या वतीने वकील अ‍ॅड. शबनम लाटीवाला यांनीही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की भारतीय दंड संहितेच्या तत्सम कलमांखाली गायकाविरुद्ध गेल्या 12 महिन्यांतील हा दुसरा एफआयआर आहे. ओशिवरा पोलिसांनी 11 ऑगस्ट 2022 रोजी एफआयआर नुसार 376, 504, 323 नोंदवले होते. त्यानंतर जैन यांनी या वर्षी 23 ऑगस्ट रोजी दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज मान्य करण्यात यावा अशी विनंती केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.