ETV Bharat / city

MLC Elections 2022  : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप सहावा उमेदवार रिंगणात उतरवणार?

author img

By

Published : Jun 9, 2022, 10:12 AM IST

Updated : Jun 9, 2022, 11:53 AM IST

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप सहावा उमेदवार रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. सहाव्या जागेसाठी हर्षवर्धन पाटील हे भाजपचे सहावे उमेदवार असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. केवळ चार जागा सहज निवडून येऊ शकणाऱ्या भाजपने सहाव्या उमेदवाराची चाल खेळळ्यामुळे विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढणार आहे.



मुंबई - २० जूनला होणाऱ्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी सध्या ११ उमेदवार रिंगणात ( MLC Election BJP Candidate ) आहेत. भाजपकडून सहावा उमेदवार म्हणून हर्षवर्धन पाटील हे आज अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून दिली. त्यामुळे आता राज्यसभे पाठोपाठ विधानपरिषदेच्या निवडणुकीत सुद्धा रंगत वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हर्षवर्धन पाटील भाजपचे सहावे उमेदवार? - काल भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी आपल्या ५ उमेदवारांची यादी घोषित केली. त्यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांच्या नावाचा समावेश आहे. यापैकी प्रवीण दरेकर, राम शिंदे व प्रसाद लाड यांनी काल उमेदवारी अर्ज भरला असून आज उमा खापरे व श्रीकांत भारतीय हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. परंतु त्याच बरोबर भाजपचा सहावा उमेदवार म्हणून हर्षवर्धन पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येत असून तेसुद्धा आज उमेदवारी अर्ज भरणार असल्याने या निवडणुकीचं टेन्शन सर्वच राजकीय पक्षांना येणार आहे. ही निवडणूक गुप्त पद्धतीने होत असल्याने यामध्ये आमदारांची मते मोठ्या प्रमाणात फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.

गुप्त मतदानाचा फायदा? - गुप्त मतदानाच्या आधारावर सहावा उमेदवार निवडून आणण्याचा भाजपकडून दावा केला जात आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा महाविकास आघाडीतील मते मिळवण्यासाठी फायदा होईल, असा विश्वास भाजपला असल्याकारणाने, त्याचबरोबर अपक्ष व छोट्या घटक पक्षांची नाराजी सामोरी आली असल्याने काही दगाफटका होऊ नये म्हणून सुद्धा सहावा उमेदवार देण्याची खेळी भाजप करत आहे. वास्तविक भाजपचा पाचवा उमेदवार प्रसाद लाड व काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांच्यामध्येच निवडून येण्यासाठी चुरस रंगणार असताना आता भाजपने सहावा उमेदवार दिल्यास ही निवडणूक अजूनही अटीतटीची होणार आहे.

मित्रपक्ष नाराज - विधानसभेतील संख्याबळ घटल्याने भाजपने मित्रपक्षांना वार्‍यावर सोडले असून शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिलेली नाही. भाजपने आम्हाला वापरून घेतले अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली असून याबाबत ते वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर सदाभाऊ खोत यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -Anil Deshmukh : सीबीआयने दाखल केलेलं आरोपपत्र अपूर्ण; अनिल देशमुखांची डिफॉल्ट जामीनासाठी कोर्टात धाव

Last Updated :Jun 9, 2022, 11:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.