Legislative Councils Election : पंकजा मुंडे यांना पुन्हा डावलून भाजपने जाहीर केली विधान परिषद उमेदवारांची यादी

author img

By

Published : Jun 8, 2022, 12:15 PM IST

Updated : Jun 8, 2022, 2:04 PM IST

भाजप

भाजपने जाहीर केली विधान परिषद उमेदवारांची यादी, पंकजा मुंडे यांना पुन्हा डावलण्यात आले आहे. भाजपने आगामी विधान परिषद उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपसोबत असलेल्या घटक पक्षांना वगळण्यात आले आहे. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई - महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक ( Legislative Council Election ) 20 जूनला होत आहे. 10 जागांसाठी होणार्‍या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना भाजपने बुधवारी (दि. 8 जून) पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP State President Chandrakant Patil ) यांनी दिली. मात्र, या यादीतून पंकजा मुंडे यांचे नाव वगळण्यात आले आहे.

बोलताना आमदार चंद्रकांत पाटील

अटीतटीची निवडणूक..? - महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना विधान परिषदेची निवडणूक ही 20 जूनला होत आहे. यासाठी 2 जूनला अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. 9 जूनपासून अर्ज दाखल करता येणार आहेत तर 20 जूनला मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरली असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांचे नाव जाहीर होईल, अशी मुंडे समर्थकांना अपेक्षा होती. मात्र, त्यांना डावलण्यात आले असून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच भाजपसोबत असलेल्या घटक पक्षातील उमेदवारांनाही डावलण्यात आले आहे. यामुळे यंदाची निवडणूक ही अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीसाठी सर्व प्रयत्न केले - पंकजा मुंडे यांच्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, हा निर्णय संघटनेकडून घेतला जातो. त्यांना उमेदवारी दिली जावी यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. तसेच नाराजी क्षणभराची असते. पक्ष त्याची योग्य ती दखल घेईल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. महाविकास आघाडीने मंगळवारी (दि. 7 जून) घेतलेल्या बैठकीबाबत ते म्हणाले, अपक्ष आमदार नाराज आहेत. कोणाला काय फायदा होईल हे माहीत नाही. पण, राज्यसभेसाठी आमचे तीन उमेदवार निवडून येतील हे निश्‍चित आहे. भाजप नेते आशिष शेलार या संदर्भामध्ये आज ( दि. 8 जून ) राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांची भेट घेत आहेत. घटक पक्षाचे एक स्थान असते त्यांना योग्य ते स्थान दिलेच पाहिजे कुठले घटक पक्ष कोणासोबत आहेत, हे लवकरच समजेल.

हेही वाचा - Legislative Council Election : विधान परिषदेत राज्यसभेची पुनरावृत्ती: महाविकास आघाडीची कसोटी लागणार

Last Updated :Jun 8, 2022, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.