ETV Bharat / city

Vidhan Parishad Election 2022 : पुन्हा रंगणार प्रसाद लाड विरुद्ध भाई जगताप सामना; जाणून घ्या, समीकरण

author img

By

Published : Jun 16, 2022, 9:28 PM IST

Prasad Lad  and Bhai jagtap
Prasad Lad and Bhai jagtap

विधान परिषदेच्या ( Legislative Council Election 2022 ) १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे भाजपाने या निवडणुकीत प्रसाद लाड ( Prasad Lad candidate in BJP Legislative Council elections ) यांना पाचव्या क्रमांकावर उमेदवारी दिल्याने व काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर भाई जगताप ( Bhai Jagtap Congress candidate ) यांना उमेदवारी दिल्याने, लाड की जगताप? यांच्यामध्ये मुख्य चुरस रंगणार आहे.

मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाल्याने महाविकास आघाडी सरकारला फार मोठा धक्का बसला आहे. विशेषतः शेवसेनेने संजय पवार यांना निवडून आणण्यासाठी प्राणप्रतिष्ठा पणाला लावली होती. आता विधान परिषदेच्या ( Legislative Council Election 2022 ) १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे भाजपाने या निवडणुकीत प्रसाद लाड ( Prasad Lad candidate in BJP Legislative Council elections ) यांना पाचव्या क्रमांकावर उमेदवारी दिल्याने व काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर भाई जगताप ( Bhai Jagtap Congress candidate ) यांना उमेदवारी दिल्याने, लाड की जगताप? यांच्यामध्ये मुख्य चुरस रंगणार आहे.



१० जागा ११ उमेदवार : राज्यसभे पाठोपाठ विधानपरिषदेच्या निवडणुकीची रंगत वाढणार यात काही शंका नाही. कारण ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाले. परंतु काँग्रेसने त्यांचा दुसरा उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने आता ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी हा चांगलाच सामना रंगणार आहे. विशेष करून दहाव्या जागेवर कोण बाजी मारणार हे पाहणे फार महत्त्वाचे ठरणार आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत.


जगताप की लाड? : या निवडणुकीत प्रत्येक पक्षाचे संख्याबळ पाहता भाजपाचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. शिवसेना, राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र भाजपाने पाचवा उमेदवार दिल्याने व काँग्रेसने दुसरा उमेदवार दिल्याने यापैकी कोण उमेदवार बाजी मारतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. भाई जगताप हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाई जगताप निवडून येणे कॉंग्रेससाठी अतिशय प्रतिष्ठेचे आहे. कारण मुंबई महानगर पालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय सुद्धा त्यांनी घेतला आहे. भाई जगताप यांना निवडून आणण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांवर प्रचंड दबाव आहे. आपली मते फुटणार नाहीत याची दक्षता या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी भाजपाने पूर्ण रणनीती आखली आहे. देवेंद्र फडणवीस लाड यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील असून लाड यांना देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्यक्तिक संबंध असल्याचा फायदाही त्यांना होणार आहे. लाड हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. तसेच सध्या ते महाविकास आघाडी सरकार विरोधात बोलायची एकही संधी सोडत नाहीत. याचा फायदा मुंबई महानगर पालिकेत भाजपाला नक्कीच होणार आहे. त्या अनुषंगाने लाड यांचा विजय पक्षासाठी महत्वाचा आहे.


काय असेल गणित? : राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोन आमदारांना मतदान करायचा अधिकार मिळाला नाही. तर त्यांचे ५१ मतदार होतील. याचा अर्थ दोन जागा निवडून आणण्यासाठी त्यांना आणखी ३ मतांची गरज असेल. राष्ट्रवादीसाठी हे कठीण नाही. विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला २७ मतांची आवश्यकता आहे. त्यानुसार भाजपाच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन जागा निवडून येऊ शकतात. मात्र काँग्रेसची एक जागा निवडून आल्यानंतर काँग्रेसकडे अतिरिक्त १७ मतं शिल्लक राहतील त्यामुळे काँग्रेसची दुसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करण्याची परवानगी मिळाली नाही तर एकूण २८५ आमदार मतदान करतील. त्यामुळे हा कोटा २७ वरून २५.१ या मतावर येईल. त्यामुळे भाजपाचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात तर शिवसेनेच्या दोन उमेदवार आणि राष्ट्रवादीची दोन उमेदवार निवडून येऊ शकतात तर काँग्रेसला दुसऱ्या जागेसाठी १० मतांची आवश्यकता असेल. त्यामुळे ही लढत काँग्रेसचे भाई जगताप विरुद्ध भाजपाचे प्रसाद लाड यांच्या होणार आहे.


यापूर्वी भाई जगताप यांनी मारली होती बाजी : मुंबई महानगरपालिकेतील विधानपरिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या जागेवर राष्ट्रवादीच्या एका गटाच्या आतून पाठिंब्यासह प्रसाद लाड तर काँग्रेसचे भाई जगताप आमने सामने होते. त्या दरम्यान शरद पवार यांच्या खेळीमुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपली भूमिका बदलली आणि त्या निवडणुकीत प्रसाद लाड यांचा पराभव झाला होता. तर भाई जगताप विजयी झाले होते. मात्र त्यानंतर प्रसाद लाड यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आता पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाई जगताप विरुद्ध प्रसाद लाड असा थेट आमने-सामने मुकाबला होणार आहे.


काय असणार समीकरण? : राज्यसभा निवडणुकीत अपक्षांसह भाजपाला १२३ मतदारांनी मतदान केले. महाविकास आघाडीला १६१ आमदारांनी मतदान केले. यावेळी शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत अवैध ठरविण्यात आले. तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करण्याची परवानगी अजूनही न्यायालयाने दिली नाही आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी विधानसभेचे सदस्य मतदान करणार आहेत. राज्यात भाजपाचे १०६ राष्ट्रवादी ५३ आणि शिवसेनेचे ५५ तर काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. मात्र राज्यात अपक्ष आणि विविध छोट्या पक्षांचे २९ इतके संख्याबळ आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीसाठी एकूण आमदारांची संख्या भागिले विधानपरिषदेच्या रिक्त जागा अधिक एक असे समीकरण आहे.

हेही वाचा - राज्यपालांनी भेट नाकारल्याच्या काँग्रेसचा आरोप; काँग्रेसच्या विनंतीवरून भेट नाकारल्याचे राज्यपालांचे स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.