ETV Bharat / city

राज ठाकरे यांच्या घरी आले बिहार विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर, चर्चांना उधाण

author img

By

Published : Sep 5, 2022, 2:42 PM IST

राज ठाकरे यांच्या घरी आले बिहार विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर
राज ठाकरे यांच्या घरी आले बिहार विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर

बिहार विधान परिषदेचे अध्यक्ष देवेशचंद्र ठाकूर यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राज ठाकरे आणि त्यांची मनसे चर्चेत आली आहे. राज ठाकरे यांची भाजप नेत्यांसोबतची भेटही गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई : हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यापासून मनसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे चर्चेत आहेत. इतकंच काय राज ठाकरे यांची भाजप नेत्यांसोबतची भेटही गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच आज बिहार विधान परिषदेचे अध्यक्ष देवेशचंद्र ठाकूर यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राज ठाकरे आणि त्यांची मनसे चर्चेत आली आहे.

ठाकूर ठाकरे भेटीचं कारण काय? - बिहार विधान परिषदेचे नवनियुक्त सभापती देवेशचंद्र ठाकूर यांनी मनसे अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मनसेच्या स्थापनेनंतर राज यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील स्थलांतरितांना 'भूमिपुत्रांना' रोजगार देण्याच्या मुद्द्यावरून विरोध केला. त्यांच्याविरुद्ध राज यांच्या लढतीची जोरदार चर्चा रंगली होती. काही महिन्यांपूर्वी राज यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे उत्तर प्रदेशचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनीही विरोध केला होता. या पार्श्‍वभूमीवर राज यांनी आता उत्तर भारतीयांबाबत नरमाईची भूमिका घेतल्याच दाखवून देण्यासाठीच ठाकूर ठाकरे भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

नवी राजकीय समीकरण चर्चांना उधाण - बिहार विधानपरिषदेच्या सभापतींची भेट घेऊन हिंदी भाषकांबाबत आपली भूमिका मवाळ करण्याचा राज यांचा प्रयत्न असल्याची चर्चा मनसेची हिंदी भाषिकांबाबत मवाळ भूमिका असल्याची चर्चा आहे. भाजप नेत्यांसोबत सुरू असलेल्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे युतीची चर्चा होत असतानाच भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याआधीच भाजप त्यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळेच आता हिंदुत्वाचा मुद्दा मान्य केल्यानंतर राज ठाकरे यांची हिंदी भाषिकांविरुद्धची भूमिका मवाळ होणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. ठाकरे आणि ठाकूर यांच्या भेटीमुळे नव्या राजकीय आघाडीच्या सुरुवातीच्या चर्चेला बळ मिळेल, असे मानले जात आहे.

बिहारी असून अस्खलित मराठी बोलतात ठाकूर - नुकतेच बिहार विधान परिषदेचे सभापती म्हणून निवडून आलेले देवेशचंद्र ठाकूर हे अस्खलित मराठी बोलतात. मुंबईत अनेक वर्षे वास्तव्य करून पुणे आणि नाशिकमध्ये शिक्षण घेतलेले ठाकूर हे मूळचे बिहारी असले तरी त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बिहार विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी जनता दल (यू)चे ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली. ठाकूर हे गेल्या 20 वर्षांपासून बिहार विधान परिषदेचे आमदार आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.