ETV Bharat / city

August Revolution Day ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांच्या उपस्थितीत नफरत हटावो मोहीम सुरु

author img

By

Published : Aug 11, 2022, 3:26 PM IST

Updated : Aug 11, 2022, 4:09 PM IST

मुंबईमधील गिरगाव चौपाटीवर स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या निमित्ताने ( August Revolution Day ) लोकशाहीरक्षणासाठी भव्य मिरवणूकचे आयोजन करण्यात आले . स्वातंत्र्यसैनिक ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जी. जी. पारिख, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता गांधी, तसेच दृश्य सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर ( Medhatai Patkar ) तसेच मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह ( Congress leader Digvijay Singh ) , तुषार गांधी या मान्यवरांच्या पुढाकारात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

August Revolution Day
ऑगस्ट क्रांती दिन

मुंबई - मुंबईमधील गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत ते ऑगस्ट क्रांती मैदान ( August Kranti Maidan ) पर्यंत स्वातंत्र्यसैनिक ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जी. जी. पारिख, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता गांधी, तसेच दृश्य सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर ( Medhatai Patkar ) तसेच मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह ( Congress leader Digvijay Singh ) , तुषार गांधी या मान्यवरांच्या पुढाकारात ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या निमित्ताने ( Azadi Ka Amrit Mohatsav ) लोकशाहीरक्षणासाठी भव्य मिरवणूकचे आयोजन करण्यात आले . तसेच आज पासून द्वेषमुलक भावना हटवा हि मोहीम देखील सुरु केली .

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक

स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांचे स्मरण - 9 ऑगस्ट 1942 या दिवशी महात्मा गांधींच्या ( Mahatma Gandhi ) ब्रिटिशांना भारत सोडा ( Quit India Movement ), या घोषणेने अवघा देश दुमदुमला . शाळेचे महाविद्यालयाचे विद्यार्थी सरकारच्या त्या वेळच्या सेवेत असलेले पोलीस, अन्य कर्मचारी यांनी देखील बंड केलं . मुंबईला ऑगस्ट क्रांती मैदान या ठिकाणाहून अरुणा सफली, महात्मा गांधी अनेक अशा थोर नेत्यांच्या पुढाकारात स्वातंत्र्याचा रणशिंग फुंकलं . स्वातंत्र्य मिळवण्याचा नवीन टप्पा त्या ठिकाणाहून सुरू झाला. अनेक शहीद क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिलं. आज स्वातंत्र्यासाठी लढलेल्या त्या ज्ञात अज्ञात सर्व शहिदांना आठवण करण्यासाठी तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता हे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी गिरगाव चौपाटी शेजारी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून ते ऑगस्ट क्रांती मैदान पर्यंत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक यांच्या पुढाकारांमध्ये अबालृद्ध, सामाजिक संघटना, पर्यावरणवादी संघटना, शिक्षक, विद्यार्थी संघटना अशा सर्वांनी सहभाग घेतला.

द्वेषमूलक भावना हटवा- ऑगस्ट क्रांती दिनाच्या संदर्भात ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर जी जी पारीख यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं की,' पुन्हा गांधींनी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला जावे लागणार. पुन्हा स्वातंत्र्याची नवी लढाई आपल्याला या आजच्या हुकूमशाहीच्या काळामध्ये करावी लागणार आहे . त्यासाठी सर्वांना एकजुटीचा आवाहन त्यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना केलं. तसेच शंभरी पार केलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता गांधी हे देखील या ठिकाणी उपस्थित होते . त्यांनी ई टीव्ही भारत शी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली . ते म्हणाले,' ज्यासाठी आम्ही हे स्वातंत्र्य मिळवलं . ते स्वातंत्र्य अजूनही टप्प्यात आलेल दिसत नाही. म्हणूनच राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा जो नारा दिला होता तो नारा अजूनही अपूर्ण आहे. आम्ही जोपर्यंत जिवंत असू तोपर्यंत लोकशाही रक्षणासाठी या देशासाठी लढत राहू. आजच्या पिढीने देखील हे स्वातंत्र्याचे महत्त्व समजून घेतलं पाहिजे;'असं देखील त्यांनी ईटीव्हीला सांगितले.

हेही वाचा - Nobel Prize winners in India या नोबेल पुरस्कार विजेत्यांनी जगात भारताची मान उंचावली

सोनिय गांधींचे डॉ जी जी पारीख यांना पत्र - आजच्या कार्यक्रमात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी देखील या प्रसंगी,' देशाच्या संविधानाला मोठी हानी पोहोचली आहे. संविधानावर अनेक आघात झाले आहे. एकूणच भारताच्या संविधानातील मूल्यांसाठी हा लढा आहे. म्हणूनच काँग्रेस पक्ष देखील जनतेच्या सोबत आहे. लोकशाहीरक्षणासाठी काँग्रेस येता काळामध्ये मैदानामध्ये आहे. द्वेषाची राजनीती हा देश सहन करणार नाही.' असे ईटीव्ही सोबत बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या . तसेच काग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी स्वतंत्र्य सैनिक डॉ जी जी पारीख यांना पत्र देखील सुपूर्त केले . त्यात संविधान रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले गेले असल्याची माहिती त्यांनी दिली. तर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी देखील ईटीव्ही भारतला सांगितले;''भारतामध्ये द्वेष आणि देशमुलक वातावरण तयार केले जात आहे. विरोधी विचार यांना सहन केले जात नाही. त्यामुळे याला महात्मा गांधींच्या विचाराने सडेतोड उत्तर द्यावे लागणार. दरम्यान गिरगाव लोकमान्य टिळकांचा पुतळा ते ऑगस्ट क्रांती मैदान यादरम्यान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला देखील सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी वंदन केलं . त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. शालेय विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तिरंगा हातात घेऊन जोरदार घोषणा दिल्या. स्वातंत्र्याच्या संदर्भात पोस्टर्स देखील विद्यार्थ्यांना हातात घेतले होते.

हेही वाचा -Achievements In Sports क्रीडा क्षेत्रात भारत देशाची प्रतिमा उंचावलेल्या भारतीय महिला

Last Updated :Aug 11, 2022, 4:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.