ETV Bharat / city

राज्याचे महाधिवक्ता राज्यपालांच्या भेटीला, कायदेशीर सल्ल्यासाठी राज्यपालांनी केले पाचारण

author img

By

Published : Nov 7, 2019, 7:13 PM IST

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना राजभवनात पाचारण केले आहे... राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेबाबत कायदेशीर सल्ला घेण्यासाठी राज्यपालांनी बोलावले...

महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १४ दिवस उलटले तरी अद्यापही महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरूच आहे. मुख्यमंत्री पदावरून युतीतला तिढा काही सुटताना दिसत नाही. यातच जुन्या सरकारची मुदत संपत असल्याने त्यानंतर कोणते उपाय योजता येतील, अथवा पाऊले उचलावीत, याबद्दल सल्ला घेण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना राजभवनात पाचारण केले आहे.

  • Mumbai: Maharashtra Advocate General, Ashutosh Kumbhakoni reaches Raj Bhavan to meet Governor, Bhagat Singh Koshyari (file pic). Term of the Maharashtra Assembly ends on 9th November. pic.twitter.com/F1nZg2BNfC

    — ANI (@ANI) November 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा... शिवसेनेकडे असलेले संख्याबळ सभागृहात दाखवू - संजय राऊत

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काय तोडगा काढावा? हा प्रश्न राज्यपालांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळेच या प्रश्नावर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना पाचारण केलंय. शुक्रवारी राज्यातील अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मुदत संपत आहे. यासर्व पार्श्वभूमीवर महाधिवक्ता आणि राज्यपाल यांची चर्चा होईल.

हेही वाचा... देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात शिवसैनिकच मुख्यमंत्री - सुधीर मुनगंटीवार

राज्याचा महाधिवक्ता म्हणजे काय ?़

महाधिवक्ता हा राज्याचा घटनात्मक आणि कायदेशीर सल्लागार असतो. महाधिवक्त्याची नियुक्ती ही राज्यपालांच्या कार्यकक्षेत येते. राज्यघटनेच्या कलम 165 मधील अनुच्छेदानुसार राज्यपाल महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. अनुभवी आणि लायक वकिलासच महाधिवक्ता म्हणून नेमण्यात येते. आशुतोष कुंभकोणी हे सध्याचे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. उच्च न्यायालयात 10 वर्षे वकिली किंवा राज्यात 10 वर्षे न्यायिक अधिकाराचा अनुभव ही पात्रता महाधिवक्ता या पदासाठी गृहीत धरली जाते.

Intro:Body:mh_mum_bjp_gov_atorny_gen__mumbai_7204684

महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी राजभवनावर पाचारण

कायदेशीर सल्ला घेण्यासाठी राज्यपालांनी बोलावले

मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या या घटनात्मक पेचावर काय आणि कसा तोडगा काढावा? हा प्रश्न राज्यपालांसमोरही उभा राहिलाय. त्यामुळेच या प्रश्नावर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांना पाचारण केलंय. काही वेळेपूर्वीच कुंभकोणी राजभवनात दाखल झालेत.


विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालानंतर १४ दिवस झाले तरी महाराष्ट्रात सुरू झालेला सत्तासंघर्ष काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीए... 'मुख्यमंत्री' पदावरून युतीतला तिढा काही सुटताना दिसत नाहीए... त्यामुळेच विरोधी पक्षात बसायला तयार असणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही राजकीय डावपेच सुरू आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू आहेत. परंतु, अद्याप कोणत्याही पक्षानं सत्तास्थापनेचा दावा दाखल केलेला नाही. त्यातच उद्या ८ नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभेची मुदत संपत आहे. तसंच सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अस्तित्वात असलेल्या सरकारची मुदतही उद्या संपतेय. यावर राज्यपाल काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय. 
Conclusion:

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.