ETV Bharat / city

Assembly Session 2022 : 'काय झाडी, काय डोंगर' ते 'ईडी-ईडी'; विरोधी बाकावरुन बंडखोर आमदारांना टोमणे

author img

By

Published : Jul 3, 2022, 3:22 PM IST

Updated : Jul 3, 2022, 3:38 PM IST

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज ( 3 जुलै ) पार ( Assembly Speaker Election 2022 ) पडली. राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी ( Rahul Narwekar Assembly Speaker ) निवड करण्यात आली आहे. यावेळी मतदानासाठी उभारलेल्या आमदारांना विरोधी बाकावरुन टोमणे मारण्यात ( Oppostion MLA Taunt Rebel Shivsena MLA ) आले.

shahaji bapu patil pratap sarnaik
shahaji bapu patil pratap sarnaik

मुंबई - आजपासून विधानसभेच विशेष अधिवेशन सुरु ( Assembly Session 2022 ) झालं आहे. दोन दिवस चालणाऱ्या अधिवेशनात राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षांची ( Rahul Narwekar Assembly Speaker ) निवड करण्यात आली आहे. त्यापूर्वी राहुल नार्वेकरांना मतदान करताना शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना राष्ट्रवादी, काँग्रेसकडून टोमणे मारण्यात ( Oppostion MLA Taunt Rebel Shivsena MLA ) आले. "काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल" तसेच, आमदार प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ), यामिनी जाधव ( Yamini Jadhav ) या मतदानासाठी उभारले असता 'ईडी-ईडी' म्हणून चिमटे काढण्यात आले.

विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यासाठी राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान करणाऱ्या भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार यांना उभे राहून आपलं नाव आणि क्रमांक सांगायचे होता. मात्र, बंडखोर आमदारांपैकी ज्यावेळेस आमदार प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव आपलं नाव सांगण्यास उभे राहिले, तेव्हा विरोधी बाकावरून 'ईडी-ईडी' म्हणत त्यांना चिमटे काढण्यात आले. तर, आमदार शहाजी बापू पाटील ( Shahaji Bapu Patil ) हे आपलं नाव सांगण्यास उभे राहिल्यास विरोधी बाकावरून जवळपास सर्वांनी 'काय झाडी, काय डोंगर, काय होटेल' असं म्हणत त्यांना चिमटे काढले. तसेच, तिथेच अपक्ष आमदार रवी राणा हे आपलं मत नोंदवण्यासाठी विधानसभेत उभे राहिल्यानंतर 'हनुमान चालीसा' असा उच्चार विरोधकांकडून करण्यात आला.

  • #WATCH | Maharashtra: MLAs on Opposition benches shouted "ED, ED" when Shiv Sena Yamini Yashwant Jadhav registered her head count for the Speaker's election in the Assembly.

    (Source: Maharashtra Assembly) pic.twitter.com/riKFAjmZDQ

    — ANI (@ANI) July 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राहुल नार्वेकरांची निवड - महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर हे निवडून आलेले आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडली. भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदासाटी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिलं. तर चेतन तुपेंकडून राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी पोल मागितला. त्यानंतर झिरवळ यांनी मतदान प्रक्रिया सुरू करण्यास प्रशासनाला आदेश दिले. त्यानंतर प्रत्येक सदस्यांजवळ जाऊन त्यांचे नाव नोंदवून घेतले गेले आणि मतदान प्रक्रिया पार पडली. राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली. तर साळवी यांना 107 एवढ्याच मतांवर समाधान व्यक्त करावं लागलं.

हेही वाचा - Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष झालेल्या राहुल नार्वेकरांचा राजकीय प्रवास...

Last Updated : Jul 3, 2022, 3:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.