ETV Bharat / city

मागचे सरकार अजित पवारच चालवत असल्याने त्यांना आमच्या सरकारचा त्रास होणारचं -मुख्यमंत्री

author img

By

Published : Aug 16, 2022, 7:13 PM IST

Updated : Aug 16, 2022, 10:30 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुर्वीचे सरकार अजित पवारच चालवत असल्याने त्यांना आमच्या सरकारचा त्रास होणारच असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अदित पवार यांना टोला लगावला आहे ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते

मुंबई - इतिहासात पहिलीच वेळ आहे ही की सध्या महाराष्ट्रात कुठल्याच तालुक्यात दुष्काळ नाही असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते दरम्यान धर्मविर सिनेमात एकनाथ कुठय हा डायलॉग आहे त्याचा उल्लेख नुकताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता त्यावर बोलताना शिंदे म्हणाले एकनाथ इथेच आहे असे प्रतिउत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत बोलताना

विरोधी पक्षनेत्यांनीही पाहणी केली पण पुर ओसरल्यावर आम्ही ग्राऊंडवर जाऊन काम करणारे लोक आहोत गडचिरोली जिल्ह्यात पुर परिस्थिती असताना आम्ही ती जाऊन पाहणी केली त्यावेळी पाऊस चालू होता हॅलिकॉप्टर पायलेट म्हणाला पाऊस चालु असल्याने आपल्याला जाता येणार नाही त्यावेळी आम्ही तात्काळ बाय रोड जाण्याचा निर्णय घेतला आणि परिस्थितीची पाहणी करून आढावा बैठकही घेतली असही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत तसेच विरोधी पक्षनेत्यांनीही पाहणी केली पण पुर ओसरल्यावर त्यांनी पाहणी केली असा टोलाही त्यांनी लगावला आहे

आम्हाला जनतेचा पाठिंबा आम्ही आकसापोटी कोणतेही निर्णय रद्द करत नाहीत आणि कुठले निर्णय घेणारही नाहीत असा दावा करताना जे निर्णय आडीच वर्षात घेतले ते निर्णय आम्ही आडीच महिन्यात घेतले असा टोला त्यांनी लगावला यावेळी गद्दार विश्वास घातकी लोकशाहीचा गळा घोटला हे सगळे बोलत असले तरी आम्हाला जनतेचा पाठिंबा दिसून आला आहे आणि हा पाठिंबा जनतेने पाहिला आहे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित पत्रकार विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्या (१७ ऑगस्ट २०२२) पासून सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली तसेच चहापानावर बहिष्कार टाकला त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे विरोधकांना गजनीची लागण झालीय असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला

विरोधी पक्षांना निमंत्रित केल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे त्याच्या पूर्वसंध्येला आम्ही चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता आणि विरोधी पक्षांना निमंत्रित केल होतं नेहमीप्रमाणेच विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे आणि सात पानी पत्र आम्हाला दिलं आहे यातील मधले चार पाने बहुदा आम्ही यापूर्वी दिलेल्या पत्रातीलच आहेत त्यातील अक्षरांतही फार फेरफार नाहीयेत शब्दांमध्येही काही फेरबदल नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की हे पत्र देताना विरोधी पक्षाला या गोष्टीची विस्मृती झाली की ते दीड महिन्यापूर्वी सत्तेत होते पण काही हरकत नाही

भाजप युतीचे सरकार मला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे मंत्रिमंडळ कार्यरत आहे त्या मंत्रिमंडळावर विरोधी पक्षाचाही विशेष विश्वास दिसतो त्यामुळेच ते सत्तेत असताना जे जे त्यांनी केलं नाही त्या सर्व अपेक्षा त्यांनी आमच्याकडून व्यक्त केल्या आहेत मी विरोधी पक्षांना आश्वस्त करु इच्छितो की आमचे शिवसेना भाजप युतीचे सरकार त्यांच्या सर्व अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करेल असही ते म्हणाले आहेत

विरोधकांना गजनीची लागण ३२ दिवस महाविकास आघाडीचाही मंत्रिमंडळ विस्तार नव्हता त्या सरकारमध्ये ३० डिसेंबर २०१९ रोजी विस्तार झाल्यावर खातेवाटप हे ५ जानेवारी २०२० रोजी झाले त्यामुळे जसे सुधीरभाऊ नेहमी सांगतात की गजनीची लागण ही कुठेतरी विरोधी पक्षाला झालेली दिसत आहे असाही टोला त्यांनी लगावला आहे त्याची आठवण आम्ही निश्चितपणे करू असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे

हेही वाचा - Vinayak Metes accident विनायक मेटे यांचा अपघात कार्यकर्त्यांना घातपाताचा संशय, पत्नीचेही आक्षेप

Last Updated :Aug 16, 2022, 10:30 PM IST

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.