ETV Bharat / city

Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील आरोपी मुनमुन धामेचाचा पासपोर्ट वापसीसाठी कोर्टात अर्ज, एनसीबीचा विरोध

author img

By

Published : Oct 7, 2022, 1:28 PM IST

munmun dhamecha
मुनमुन धामेचा

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (cordelia cruise party) अटक करण्यात आलेली मुनमुन धामेचा (munmun dhamecha) हिने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टामध्ये पासपोर्ट परत मिळावे याकरिता अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 10 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

मुंबई: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (aryan khan) याला कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (cordelia cruise party) काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी मुनमुन धामेचा (munmun dhamecha) हिने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टामध्ये पासपोर्ट परत मिळावे याकरिता पुन्हा अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 10 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

मुंबई सत्र न्यायालय
मुंबई सत्र न्यायालय

अटकेनंतर केला होता पासपोर्ट जप्त: कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी मुनमुन धामेचा हिच्या जवळ देखील ड्रग्स मिळालं होतं, असं एनसीबीने दाखल केलेल्या आरोप पत्रात म्हटले आहे. मुळची दिल्लीची रहिवासी धामेचा पार्टी निमित्त ती मुंबईत आली होती. जामीन मंजुरीच्या वेळी मुनमुन धामेचा हिला भारत सोडून जाण्यास बंदी घातली होती तसेच तिचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता.

हजेरी बंद करण्यात यावी अशी विनंती: मुनमुन धामेचा हिच्या वतीने वकील आली काशीफ खान देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टामध्ये धामेचा जवळ प्राप्त झालेले अमली पदार्थ कमी स्वरूपाचे होते असे म्हटले आहे. मुनमुन धामेचा दिल्लीत राहत असल्याने तिला वारंवार मुंबई एनसीबी कार्यालयामध्ये हजेरी लावण्याकरिता यावे लागत होते, त्यामुळे आरोपीची हजेरी बंद करण्यात यावी अशी विनंती अर्जाद्वारे करण्यात आली होती.

आठ जणांना अटक: 2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूजवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला होता. या छाप्याचे नेतृत्व एनसीबी मुंबईचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी केलं होतं. सदर क्रूजवर ड्रग पार्टी सुरू आहे अशी माहिती तेव्हा एनसीबी अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर केलेल्या कारवाईदरम्यान एनसीबीच्या टीमने आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा या तिघांसोबत एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. एनसीबी कडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात आर्यन खान, आविन साहू, गोपाळ आनंद, समीर सेहगल, भास्कर अरोडा व मानव सिन्हा या सहा आरोपीं विरोधात कुठलेही आरोप सिद्ध न होऊ शकल्याने त्यांचा या केसमधून निर्दोष सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

6000 पानांचे आरोपपत्र सादर: या प्रकरणी एनसीबी कडून एकूण 6000 पानांचे व एकूण 10 खंडांचे आरोपपत्र 27 मे रोजी सादर करण्यात आलं आहे. हे आरोप पत्र सध्या न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये आहे. या प्रकरणात तपास विशेष एनसीबी एसआयटी करत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस कोर्टाने एसआयटीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदत वाढवून दिली होती. कॉर्डेलिया क्रूज ड्रग प्रकरणी आत्तापर्यत एकूण 20 लोकांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय? : मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आलं होतं. क्रूजवरून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यन खान तब्बल 27 दिवस जेलमध्ये होता. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हाट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचे देखील नाव होते. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. या दोघांतील व्हाट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होता, त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयात तीन दिवस झालेल्या युक्तिवादानंतर अखेर आर्यन खानला जामीन मंजूर झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.