ETV Bharat / city

Sunanda Shetty Arrest Warrant Issued : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आई सुनंदा शेट्टींच्या अडचणीत वाढ; कोर्टाने केले अटक वॉरंट जारी

author img

By

Published : Mar 15, 2022, 3:15 PM IST

Updated : Mar 15, 2022, 3:34 PM IST

Sunanda Shetty Arrest warrant Issued
सुनंदा शेट्टींच्या अडचणीत वाढ

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आईच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी विरोधात अटक वॉरंट जारी ( Sunanda Shetty Arrest warrant Issued ) करण्यात आले आहे. 21 लाख फसवणूक प्रकरणी हे अटक वॉरंट जारी केले आहे. परहड आमरा या ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाने याबाबत तक्रार केली होती.

मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आईच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी विरोधात अटक वॉरंट जारी ( Sunanda Shetty Arrest warrant Issued ) करण्यात आले आहे. 21 लाख फसवणूक प्रकरणी हे अटक वॉरंट जारी केले आहे. परहड आमरा या ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाने याबाबत तक्रार केली होती.

शिल्पाच्या आईच्या विरोधात जामीन पूर्व अटक वॉरंट -

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांच्या अडचणीत वाढ झाली असून फसवणुकीच्या प्रकरणात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जामीन पूर्व अटक वॉरंट आज जारी केला आहे. या प्रकरणात पुढील सुनवणी 21 एप्रिल रोजी होणार आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची बहीण शमिता शेट्टी हेदेखील सहआरोपी होत्या. मात्र दिंडोशी सत्र न्यायालयाने या दोन्ही बहिणींना तात्पुरता दिलासा दिला होता.

मागील सुनावणीच्या वेळी शिल्पा म्हणाली होती -

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची आई सुनंदा शेट्टी आणि बहीण शमिता शेट्टी यांनी परहड आमरा नामक व्यक्तींची 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात यावी याकरिता न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने कारवाई सुरू केली आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने प्रक्रिया जारी केली आणि शिल्पा शेट्टी त्यांच्या आई आणि बहिण शमिता शेट्टी तिघांना समन्स बजावले होता. त्यांच्या विरोधात कलम 406, 420 आणि 34 अंतर्गत चौकशी सुरू आहे. मागील सुनावणीदरम्यान शिल्पा शेट्टी यांनी न्यायालयात सांगितले होते, की फसवणुकीची तक्रार दाखल केलेली फक्त प्रसिद्धीसाठी आणि माझी बदनामी होण्याच्या हेतूने करण्यात आली आहे. या प्रकरणात माझा कुठलाही संबंध नाही असेच शिल्पा शेट्टीने न्यायालयात सांगितले होते.

काय आहे प्रकरण -

परहड आमरा या ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाने तिघांविरुद्ध लॉ फर्म मेसर्स वाय अँड ए लीगल मार्फत त्यांची 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, शिल्पा शेट्टी, बहीण शमिता आणि आई सुनंदा यांनी 21 लाखांचे कर्ज फेडले नाही. जे शिल्पा आणि शमिताचे वडील सुरेंद्र शेट्टी यांनी घेतले होते. त्यानंतर तक्रारदाराने जुहू पोलीस ठाण्यात लेखी तक्रार पाठवली. जिथे पीडिताला दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात कोर्टात खासगी तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा - Devendra Fadnavs : ठाकरे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का?- देवेंद्र फडणवीस

Last Updated :Mar 15, 2022, 3:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.