Anil Deshmukh Bail Application : अनिल देशमुख यांना जेल की बेल? आज मुंबई सत्र न्यायालयात फैसला

author img

By

Published : Jan 11, 2022, 10:53 AM IST

अनिल देशमुख

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. (Anil Deshmukh Bail Application) अनिल देशमुख यांच्या जामिनाला ईडीने विरोध दर्शवला असून देशमुख यांनी जामिनासाठी केलेला अर्ज अवैध असल्याचे ईडीने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात सांगितले आहे. (Anil Deshmukh's bail application to be heard in Mumbai Sessions Court) आता आज न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना (Former Home Minister Anil Deshmukh) अटक केली होती ईडीने अटक केल्यापासून ते आर्थर रोड जेलमध्ये आहेत. देशमुख यांनी (दि.04 जानेवारी) रोजी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. (Anil Deshmukh Bail Application) या अर्जावर आज मंगळवार (दि.11) रोजी सुनावणी होणार आहे. (100 crore recovery case) त्यामुळे आज अनिल देशमुख यांना जामीन मिळतो की पुन्हा जेलमधील मुक्काम वाढतो हे पहावे लागणार आहे.

न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले

100 कोटी कथित प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 71 दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहेत. अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच, अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांची पत्नीचा भाऊ यांना देखील सहआरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.

आज न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष

देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख यांच्या जामिनाला ईडीने विरोध दर्शवला असून देशमुख यांनी जामिनासाठी केलेला अर्ज अवैध असल्याचे ईडीने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात सांगितले आहे. आता आज न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावे यासाठी ऋषिकेश देशमुखने न्यायालयात धाव

अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने फरार घोषित केले आहे. या प्रकरणात एकूण 3 जणांना ईडीने फरार घोषित केले आहे. वारंवार समन्स देवून देखील ऋषिकेश देशमुख हा चौकशीला हजर राहिला नाही. मात्र, याप्रकरणी अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावे यासाठी ऋषिकेश देशमुखने न्यायालयात धाव घेतली होती. पण याप्रकरणी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच, देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

हेही वाचा - Corona Update : भारतात कोरोना प्रकरणांमध्ये घट, 1.68 लाख नवीन रुग्णांची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.