ETV Bharat / city

राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिकांचे परवानगी अर्ज दाखल

author img

By

Published : Jun 3, 2022, 9:30 PM IST

राज्यसभा निवडणुकीच्या मतदाना अनिल देशमुख आणि नवाब मलिकांनी ( Home Minister Anil Deshmukh and Minister Nawab Malik ) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए ( Special PMLA Court ) कोर्टामध्ये अर्ज केला आहे. या अर्जावर सोमवारी 6 जून रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदारांविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली होती.

निल देशमुख आणि नवाब मलिक
निल देशमुख आणि नवाब मलिक

मुंबई - राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यात यावे याकरिता अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी आज (शुक्रवारी) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये ( Special PMLA Court ) अर्ज केला आहे. या अर्जावर सोमवारी 6 जून रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदारांविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक ( Home Minister Anil Deshmukh and Minister Nawab Malik ) यांना अटक करण्यात आली होती. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहे.


राज्यसभा निवडणूक आता बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण राज्यसभेच्या 6 जागांसाठी एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेना अर्थात महाविकास आघाडीकडून कोल्हापूरचे संजय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. महाविकास आघाडीने ती निवडणूक बिनविरोध होण्याकरिता प्रयत्न केले होते. मात्र भारतीय जनता पार्टीकडून शिवसेनेला त्यांचा उमेदवार मागे घेण्याचे सांगितले आले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून उमेदवार मागे घेण्यात आले नसल्याने आता सातव्या जागेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला प्रत्येक मत महत्वाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अटकेत असलेले दोन्ही आमदारांना मतदाना करीता परवानगी देण्यात यावी याकरिता अर्ज करण्यात आला आहे.

हेही वाचा - Terror Funding Case Pune : आरोपी आफताब शाहला 14 जूनपर्यंत एटीएस कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.