ETV Bharat / city

Anil Desai On Patiala Incident : 'पटियाला घटनेशी शिवसेनेचा काडीचा संबंध नाही'

author img

By

Published : Apr 29, 2022, 5:22 PM IST

पंजाबमधील पटिलाया येथे शिवसेना कार्यकर्ते आणि खलिस्तानी समर्थकांमध्ये हिंसाचाराची ( Patiala Shiv Sena khalistan Supporters Clash ) घटना घडली. शिवसेनेचा या घटनेशी काडीचा संबंध नाही, असे स्पष्टीकरण शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई ( Anil Desai on Patiala incident ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिले.

Anil Desai
Anil Desai

मुंबई - पंजाबमधील पटिलाया येथे शिवसेना कार्यकर्ते आणि खलिस्तानी समर्थकांमध्ये हिंसाचाराची ( Patiala Shiv Sena khalistan Supporters Clash ) घटना घडली. शिवसेनेचा या घटनेशी काडीचा संबंध नाही, असे स्पष्टीकरण शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई ( Anil Desai on Patiala incident ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिले. शिवसेना विनाकारण सखोला बिघडवत नाही, असेही देसाई म्हणाले. पंजाबमध्ये झालेली हिंसाचाराच्या घटनेमागे ( punjab patiala violence ) मागे नेमका कोणाचा हात आहे, हे अद्याप समोर आलेले नाही.

तणावपूर्ण स्थिती
शिवसेनेचे पंजाब येथील कार्याध्यक्ष हरिष शेख यांनी पटीयाला मध्ये खलिस्तान विरोधात मोर्चा काढला होता. अनेक शीख संघटना आणि हिंदू कार्यकर्ते यावेळी आमने सामने आले. दरम्यान, दोन्हीकडून दगडफेक झाली. शीख संघटनांनी नंग्या तलवारी काढल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती पांगवली. यावेळी अनेकांना ताब्यात घेतले.

आमचा काडीचा संबंध नाही
या घटनेप्रकरणी शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांना विचारले असता, शिवसेनेचा या घटनेशी काही संबंध नाही. शिवसेना कोणत्याही राज्यात उगाच दोन समाजात तेढ निर्माण करत नाही. विनाकारण सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणार नाही. ज्यांनी कोणी असे कृत्य केले आहे, त्याच्याशी शिवसेनेचा काडीचा संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - Patiala Shiv Sena khalistan Supporters Clash : पटियालात शिवसैनिक आणि खलिस्तानी समर्थकांमध्ये हाणामारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.