ETV Bharat / city

कलम 370 ला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा - अमित शाह

author img

By

Published : Sep 22, 2019, 2:11 PM IST

Updated : Sep 22, 2019, 4:56 PM IST

कलम 370 आणि 35 'अ' ला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, अशी घणाघाती टीका गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केली. मुंबई भाजपच्या वतीने 'कलम 370 : एक मंथन' या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

अमित शाह

मुंबई - कलम 370 ला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी केले. तसेच "तुम्हाला राष्ट्रप्रेमी सत्ता हवी का? राष्ट्रद्रोही? असे म्हणत त्यांनी भाजपचं पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला.

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे कलम 370च्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी शाह यांनी कलम 370 हटवण्यास विरोध करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रद्रोही पक्ष आहेत, अशी टीका केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाह यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत अभुतपूर्व यश मिळणार आहे, असे वक्तव्य केले. यावेळी राज्याचे निवडणूक भूपेंद्र यादव, सरोज पांडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा - अमित शाहंच्या मुंबई सभेसाठी रोजंदार मजुरांचा भरणा

सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक करण्यात आली तेव्हा विरोधी पक्षांनी त्याला विरोध केला. पुरावे मागितले. देशविरोधी घोषणा देणाऱ्या जेएनयूमधील विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी उभे राहिले. त्यामुळे आता राष्ट्रवादी विचाराच्या भाजपला आणि त्यांच्या मित्रपक्षांना साथ द्यायची, की परिवारवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांना साथ द्यायची, याचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेने करावा, असे आवाहन शाह यांनी केले. यावेळी त्यांनी देशहिताच्या प्रश्नावर राजकारण करू नका, असा टोलाही राहुल गांधी आणि शरद पवारांना लगावला.

शाह यांनी कलम 370 आणि कलम 35 अ हटवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले. ते म्हणाले, की ''कलम 370 हटवण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला होता. त्यामुळे शरद पवार आणि राहुल गांधी यांनी कलम 370 हटवण्यास त्यांचा पाठिंबा आहे, की विरोध आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे. राहुल गांधींची आजी इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना 1971 च्या युद्धात भारताने पाकिस्तानला नमवले. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी कौतुक केले होते. 1994 मध्ये काश्मीरबाबत काँग्रेस सरकारने आणलेल्या प्रस्तावाला भाजपने पाठिंबा दिला होता. तसेच अटलबिहारी वाजपेयी विरोधी पक्षात असतानाही संयुक्त राष्ट्रांत सरकारचे प्रतिनिधी म्हणून गेले होते, त्यामुळे देशहिताच्या प्रश्नावर राजकारण करू नका, असे म्हटले.

हेही वाचा - भाजपच्या ‘दृष्टीपत्रावर' एक दृष्टीक्षेप..!

कलम 370 हा भाजपसाठी राजकीय मुद्दा आहे, असे राहुल गांधी म्हणतात. पण काश्मीर आणि कलम 370 हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही. कलम 370 हटवण्यासाठी आमच्या 3 पिढ्या खपल्या. श्यामप्रसाद मुखर्जी यांच्यासह अनेकांनी बलिदान दिले आहे. अखंड भारत हेच आमचे लक्ष्य आहे, असे शाह यावेळी म्हणाले.

गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -

  • निवडणूक झाल्यावरही फडणवीस राहणार मुख्यमंत्री अमित शाह यांची घोषणा
  • प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांना अभिमान वाटणारा क्षण आहे, की 370 रद्द ने प्रचाराची सुरुवात होतेय
  • निवडणुकीत भाजपचाच विजय निश्चित
  • हरियाणा-महाराष्ट्रात भाजपचेच सरकार येईल
  • महाराष्ट्रात पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री होणार, ही जनतेची इच्छा
  • धारा 370 रद्द करण्यासाठी नेहमीच भाजपने पुढाकार घेतला
  • अभिमानाने सांगतो की काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे
  • एक देश, एक राष्ट्र ध्वज, एक संविधान चा नारा देत भाजप कार्यकर्त्यांनी बलिदान दिले
  • श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाची केली आठवण, त्यांनी काश्मीरसाठी पहिलं बलिदान दिले
  • राहुल गांधी 370 राजनीती असल्याचं म्हणत आहेत. मात्र, राहुल बाबा तुम्ही राजकारण आता आलात, मात्र आमच्या 3 पिढ्या त्यासाठी लढल्या
  • भारत मातेला अखंड करण्याच स्वप्न
  • काँग्रेसला यात राजकारण दिसत तर आम्हाला देशभक्ती दिसते
  • भारताला जोडण्याच काम सरदार वलभभाई पटेल यांनी केला,
  • त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी युद्धाची घोषणा केली, त्यामुळे काश्मीर व्याप्त प्रश्न उभा ठाकला आहे, ही नेहरू यांची चूक होती
  • पाकव्याप्त काश्मीर ला विवादाचा प्रश्न निर्माण केला
  • दिल्लीत जो समझोता झाला, त्यावेळी 370, 35 अ अस्तित्वात आले
  • मनमोहन सिंग व इंद्रकुमार गुजराल हे शरणागती पतकरलेले पंतप्रधान
  • कलम 370 मुळे काश्मीर पंडितांना काढून टाकण्यात आले, 40 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला
  • कलम 370 मुळे आतंकवाद वाढला
  • काँग्रेसला सत्ता, वोट बँक बनवायची आहे. मात्र, आम्हाला 40 हजार जणांनी जीव गमावला त्याचे दुःख आहे
  • मोदी आतंकवाद मुक्त काश्मीर करतील
  • आता काश्मीरमध्ये शांती निर्माण झाली
  • शरद पवार यांनी कान उघडून ऐकावे काश्मीर मध्ये अशांतता नाही
  • दलितांच्या आरक्षणाबाबत बोलले जाते. मात्र, तिथे त्यांना आरक्षण मिळत नव्हते
  • अट्रोसिटी कायदा मोदींमुळे तिथे लागू झाला
  • बालविवाह कायदा देखील तिथे लागु झाला, यामुळे तेथील मुली सुरक्षित झाल्या
  • तीन परिवार कश्मीर मध्ये राज्य करत होते, त्यांनी भ्रष्टाचार कायदा लागू केला नव्हता
  • तेथे भ्रष्टाचार झाला नसता तर काश्मीरवासीयांच्या घरी सोन्याचे पत्रे लागले असते
  • आता तिथे भ्रष्टाचार विरोधी कायदा लागू झाला
  • मोदींमुळे काँग्रेस व राष्ट्रवादी नेते भ्रष्टाचाराला घाबरतात, आता काश्मीर मध्ये ही मुफ्ती कुटुंब घाबरत
  • शरद पवारांचा 370 ला विरोध
  • जेव्हा निर्णय देशाचा हिताचा असतो तेव्हा राजकारण केलं जातं नाही असे राहुल गांधींना सुनावले
  • कॉग्रेस, राष्ट्रवादी 370 रद्द केल्याच निर्लज्जपणे विरोध करत असल्याची केली टीका
  • राज्याला प्रत्येक क्षेत्रात फडणवीस यांनी नंबर एकवर आणलं
  • 370 रद्द केल्यासोबत कोण आहे आणि विरोधात कोण आहे, हे महाराष्ट्रातील नागरिकांनी ओळखावं
  • राज्यातील जनता आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला दाखवेल
  • 370 रद्द करून आमचं काम संपल नाही तर आता सुरू झाले
Last Updated :Sep 22, 2019, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.