ही तर नारायण राणे यांची दादागिरी; राज्यातील सरकार बरखास्त करा, अंबादास दानवेंंची मागणी

author img

By

Published : Sep 12, 2022, 6:45 PM IST

परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे

केंद्रातील मंत्री नारायण राणे हे थेट दादागिरी bully of Narayan Rane करत धमकी देत आहेत. शिंदे-फडणवीस यांचे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालून दादागिरी करत उघडपणे धमक्या देत फिरत असेल तर असे दादागिरी करणारे सरकार बरखास्त केले जावे, Dismiss government from Maharashtra अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Leader of Opposition in Legislative Council Ambadas Danve यांनी केली आहे.

मुंबई : केंद्रातील मंत्री नारायण राणे हे थेट दादागिरी bully of Narayan Rane करत धमकी देत आहेत. शिंदे-फडणवीस यांचे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालून दादागिरी करत उघडपणे धमक्या देत फिरत असेल तर असे दादागिरी करणारे सरकार बरखास्त केले जावे, Dismiss government from Maharashtra अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Leader of Opposition in Legislative Council Ambadas Danve यांनी केली आहे.

परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राज्यातील स्थितीवर बोलताना


शिवसेनेची सदा तरवणकरांनी धमकी - प्रभादेवी येथील राड्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शिंदे गटानेही शिवसेनेला शह देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेत मुंबईत फिरणे मुश्किल करू, असा धमकी वजा इशारा शिवसेनेला दिला. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी, जोरदार प्रत्युत्तर दिले.

आमदार सदा सरवणकरांवर गोळीबाराचा आरोप - दानवे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादात आमदार सदा सरवणकर यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. अशा आमदाराला माझा मित्र असल्याचे म्हणत केंद्रातील मंत्री भेटत असतील आणि मुंबई व महाराष्ट्रात फिरायचं आहे ना अशा धमक्या देत असतील तर राज्यातील हे सरकार गुंडांचं सरकार आहे का, असा सवाल उपस्थित केला. मुंबई व महाराष्ट्र शिंदे भाजप यांना आंदण म्हणून दिल आहे का असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत, ते जर राज्यात कायदा व सुव्यस्था राखू शकत नसतील आणि अशाप्रकारे गुंडगिरी व दादागिरी होत असेल तर अशा सरकार ला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचा दानवे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.