ETV Bharat / city

आफ्रिकन तस्कराला 9 लाखांच्या अमली पदार्थासह अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

author img

By

Published : Jun 26, 2021, 5:23 PM IST

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये नायजेरियन अमली पदार्थ तस्कराला अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 60 ग्रॅम एमडी व 35 ग्रॅम कोकेन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

Breaking News

मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये नायजेरियन अमली पदार्थ तस्कराला अटक केली आहे. यामध्ये तब्बल 60 ग्रॅम एमडी व 35 ग्रॅम कोकेन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याची आंतरराष्ट्रीय बाजारात 9 लाख 50 हजार इतकी किंमत आहे.

मानखुर्द टि-जंक्शनवरून घेतले ताब्यात

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटला तस्करांविषयी माहिती मिळाली. या माहितीवरून नवी मुंबई, ठाणे, मिरा रोड, नालासोपारा या ठिकाणी राहत असलेले काही आफ्रिकन लोक अमली पदार्थाची तस्करी करतात हे समोर आले. यातील व्यक्ती मुंबई उपनगरात कोकेन या अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती समोर आली. होती. त्यानुसार पोलिसांनी (24 जून) रोजी मुंबईतील मानखुर्द टि-जंक्शन येथील बस स्थानकाजवळ सापळा रचला. या ठिकाणी एक आफ्रिकन वंशाचा व्यक्ती संशयास्पद आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. दरम्यान, त्या व्यक्तीकडून 60 ग्रॅम एमडी व 35 ग्रॅम कोकेन पोलिसांनी ताब्यात घेतले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत 9 लाख 50 हजार एवढी आहे. पोलिसांनी या प्रकरणात सेलेस्तीने या नायजेरियन अमली पदार्थ तस्करला अटक केली आहे. तो नालासोपारा येथे राहत आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा मुंबई उपनगरात बऱ्याच महिन्यांपासून अमली पदार्थांचे वितरण करत असल्याची माहिती या तपासात समोर आली आहे.

काय आहे हा पदार्थ?

एमडी आणि कोकेन हे सिंथेटिक ड्रग्स असून, त्याचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब, पचनक्रिया बिघडणे, मेंदूचा समतोल जाणे, डिप्रेशन येणे अशा प्रकारचे शरीरावर परिणाम होतात. एमडी हे मेफेद्रोणन, म्याऊ म्याऊ, व्हाईट मॅजिक या नावानेसुद्धा ओळखले जाते. तर कोकेण हे कोका या वनस्पतीपासून बनवले जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.