ETV Bharat / city

जीतके हारनेवाले को खोके सरकार कहते है, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला टोला

author img

By

Published : Sep 14, 2022, 10:09 PM IST

आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे सरकार महाराष्ट्रातून उद्योग गुजरातमध्ये नेत असल्याचा आरोप केला आहे (Aditya said losers called Khoka government). तर, 'हार के जीतने वाले को बाजीगर कहते है पण इथ जितके हारनेवाले को खोके सरकार कहते है' असं म्हणत शिंदे फडणवीस सरकारला टोला लगावला आहे (losers called Khoka government).

आदित्य ठाकरेंचा टोला
आदित्य ठाकरेंचा टोला

मुंबई - भारतीय समूह वेदांत आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील दिग्गज फॉक्सकॉनने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले एफएबी उत्पादन कंपनी स्थापन करण्यासाठी गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. मात्र, हा प्रकल्प महाराष्ट्रात प्रस्तावित असताना इतका मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेलाच कसा (Aditya said losers called Khoka government)? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे सरकार महाराष्ट्रातून उद्योग गुजरातमध्ये नेत असल्याचा आरोप पत्रकार परिषद घेत केला आहे. तर, 'हार के जीतने वाले को बाजीगर कहते है पण इथ जितके हारनेवाले को खोके सरकार कहते है' (losers called Khoka government) असं म्हणत शिंदे फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.

आमचं शिष्ठमंडळ काम करत होतं - यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, वेदांता प्रकल्प का नाही आला याबद्दल सरकार कडून कोणतंही खुलासा आला नाही. फक्त आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण, हा प्रकल्प महाराष्ट्रात का नाही आला हे सांगत नाहीयेत. माझं आज सकाळी सुभाष देसाई यांच्याशी बोलणं झालं. आमच्या शिष्ठमंडळ काम करत असताना साधारण जून महिन्यात 40 गद्दारांनी आपलं सरकार पाडलं आणि त्या प्रकल्पाचं काम राहील. पण, त्यानंतर तो प्रकल्प दुसरीकडे का गेला हे सुद्धा कोणी सांगत नाहीये. बल्क पार्क देखील गुजरात मध्ये जातं आहे. असं आदित्य यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री मंडळांना भेटत असताना प्रकल्प पळवले - पुढं बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री वेगवेगळ्या मंडळांना भेटत होते. पण याचे उत्तर नाही दिले. आणि मुख्यमंत्री यांनी हा प्रकल्प आपल्या राज्यात येणार असं हाऊस मध्ये सांगितलं. मग काय झालं? हा प्रकल्प रोजगार देणार आहे. गुंतवणूक देणार आहे मग हा प्रकल्प तुम्ही जाऊच कसे देतात? आपण जो बल्क पार्कचा प्रस्ताव दिला तो सुद्धा निघून जातो. या व्यवस्थेने बरोबर हा पळवून लावला आहे. आमचं वेगळ्या विचारधाराचे सरकार असलं तरी केंद्र सरकार सोबत बोलणी करून पाठपुरावा करू शकतो. मग या सरकार च नेमक काय झालं? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांवर टीका - आमचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना तेव्हाचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची त्या कंपन्यांच्या शिष्ठमंडलासोबत बैठक झाली आणि तळेगाव कसे योग्य आहे ते पटवून दिले होते. आताचे मुख्यमंत्री गणपती मंडळ फिरत होते. आता गरबा येईल तेव्हा ते गरागरा फिरतील. तेव्हा त्यांनी जरा कामावर लक्ष द्यावे. दहीहंडीला खेळाचा दर्जा देऊ म्हणाले आणि तो विषय सोडून दिला. मग म्हणाले विमा संरक्षण देऊ ते सुद्धा सोडून दिल. हे फक्त जाहीर करतात आणि सोडून देतात. त्या बाजीगर चित्रपटातील एक डायलॉग आहे. हार के जीतने वाले को बाजीगर कहते है पण इथ वेगळं आहे. इथं जितके हारनेवाले तो खोके सरकार कहते है." अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.