ETV Bharat / city

Mumbai Dam Water मुंबईकरांना दिलासा धरणांमध्ये 96.06 पाणीसाठा

author img

By

Published : Aug 17, 2022, 5:31 PM IST

Updated : Aug 17, 2022, 6:43 PM IST

Mumbai Dam Water
Mumbai Dam Water

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ९६.०६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे मुंबईला ३६१ दिवस पुरेल इतका पाणीपुरवठा सध्या धरणात जमा झाला 96.06 percent rise in water stock at seven dams in mumbai आहे

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ९६.०६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला ३६१ दिवस पुरेल इतका पाणीपुरवठा सध्या धरणात जमा झाला आहे. मुंबईची वर्षभराची तहान भागवायला आणखी ५७,०८९ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज 96.06 percent rise in water stock at seven dams in mumbai आहे.

धरणांमध्ये ९६.०६ टक्के पाणीसाठा - मुंबईमध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पाऊस पडतो. मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. २९ जूनपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. २९ जूनला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ धरणांमध्ये १ लाख ४७ हजार ६ दशलक्ष लिटर म्हणजेच १०.१६ टक्के पाणीसाठा होता. आज ( १७ ऑगस्ट) सकाळी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १३,९०,२७४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. धरणांमध्ये सध्या ९६.०६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सध्या धरणात ३६१ दिवसांचा पाणी साठा आहे.



५७,०८९ दशलक्ष लिटर पाण्याची गरज - मुंबईला वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. सध्या धरणांमध्ये १३,९०,२७४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा ९६.०६ टक्के पाणीसाठा आहे. पालिकेची सातही धरणे भरण्यासाठी आत केवळ ५७,०८९ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे. आतापर्यंत मोडक सागर, तानसा आणि तुळशी ही तीन धरणे भरून वाहू लागली आहे. सध्या ३६१ दिवस पुरेल इतका पाणी आहे. ऑगस्ट महिना सुरु आहे. सप्टेंबर महिन्यातही पाऊस पडेल. यामुळे धरणे भरतील अशी माहिती पालिकेच्या जल विभागाकडून देण्यात आली आहे.



३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा - मुंबईला वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसामुळे हा पाणीसाठा जमा होत होता. मात्र, यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. यामुळे २७ जून रोजी १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. ८ जुलैला धरणात २५ टक्के पाणी साठा जमा झाल्यावर पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. त्यामधील ठाणे, भिवंडी महानगरपालिकेला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो.



१७ ऑगस्टला एकूण पाणीसाठा -
२०२२ मध्ये १३,९०,२७४ दशलक्ष लिटर (९६.०६ टक्के)
२०२१ मध्ये १२,०४,५४२ दशलक्ष लिटर (८३.२२ टक्के)
२०२० मध्ये ११,४४,६७३ दशलक्ष लिटर (७९.०९ टक्के)



धरणातील पाणीसाठा -
अप्पर वैतरणा २,१४,०२९ दशलक्ष लिटर
मोडक सागर १,२८,९२५ दशलक्ष लिटर
तानसा १,४४,४७५ दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा १,८२,७१३ दशलक्ष लिटर
भातसा ६,८४,३८८ दशलक्ष लिटर
विहार २७,६९८ दशलक्ष लिटर
तुलसी ८,०४६ दशलक्ष लिटर

हेही वाचा - Sunil Prabhu शिवसेना विधिमंडळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पगार थकले नाही सुनिल प्रभूंचे स्पष्टीकरण

Last Updated :Aug 17, 2022, 6:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.