ETV Bharat / city

Mumbai Corona Update - मुंबईत रुग्णसंख्या वाढ सुरूच, 922 नव्या रुग्णांची नोंद

author img

By

Published : Dec 26, 2021, 8:25 PM IST

BMC
बीएमसी

आज (26 डिसेंबरला) 922 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

मुंबई - मुंबईमध्ये गेल्या दोन वर्षांत कोरोना विषाणूच्या दोन लाटा आल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. मात्र, डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला 108 रुग्ण आढळून आले होते, त्यात गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. आज (26 डिसेंबरला) 922 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा - लहान मुलांच्या लसीकरणासाठी पालिका सज्ज, केंद्र सरकारच्या गाईडलाईनची प्रतिक्षा

आज 922 नवे रुग्ण -

आज 26 डिसेंबरला 922 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 2 मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 71 हजार 112 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 47 हजार 864 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 16 हजार 370 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 4 हजार 295 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के ( corona patient recovery rate in Mumbai ) तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1 हजार 139 दिवस इतका आहे. मुंबईमधील 22 इमारती सील करण्यात आल्या आहेत. 19 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.06 टक्के इतका आहे.

या दिवशी रुग्णसंख्या वाढली -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. 4 डिसेंबरला 228, 8 डिसेंबरला 250, 11 डिसेंबरला 256, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबरला 295, 18 डिसेंबरला 283, 19 डिसेंबरला 336, 21 डिसेंबरला 327, 22 डिसेंबरला 490, 23 डिसेंबरला 602, 24 डिसेंबरला 683, 25 डिसेंबर 757, 26 डिसेंबर 922 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

सात वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. मुंबईमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. त्याचप्रमाणे मृत्यूंची संख्या कमी करण्यात यश आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात 1 ते 6 मृत्यूची नोंद झाली होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला दुसऱ्यांदा, 15 डिसेंबरला तिसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर 18 डिसेंबरला चौथ्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली होती. 20 डिसेंबरला पाचव्यांदा, 22 डिसेंबरला सहाव्यांदा तर, 25 डिसेंबरला सातव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूची संख्या शून्य होत (corona patient deaths in Mumbai) असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा - Mahavikas Aghadi Leaders Meets Governor : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.