ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत आज 8 हजार 82 कोरोना रुग्णांची नोंद, 2 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Jan 3, 2022, 8:33 PM IST

BMC
बीएमसी

मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला १०८ रुग्ण आढळून आले होते. त्यात वाढ होऊन काल (२ जानेवारीला) ८ हजार ६३ रुग्णांची नोंद झाली होती. आज ८ हजार ८२ रुग्णांची नोंद झाली आहे. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे.

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला १०८ रुग्ण आढळून आले होते. त्यात वाढ होऊन काल (२ जानेवारीला) ८ हजार ६३ रुग्णांची नोंद झाली होती. आज ८ हजार ८२ रुग्णांची नोंद झाली आहे. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या वाढली असली तरी, बहुसंख्य रुग्ण हे लक्षणे नसलेले असल्याने रुग्णालयातील ९० टक्के बेड रिक्त आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईकरांचे व आरोग्य विभागाचे टेंशन वाढले आहे.

हेही वाचा - Mumbai Water Taxi Service : मुंबईत अत्याधुनिक वॉटर टॅक्सी दाखल; प्रवाशांना मिळणार 'या' सुविधा

८०८२ नव्या रुग्णांची नोंद -

मुंबईत आज ( ३ जानेवारी ) ८ हजार ८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, २ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ६२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ८ लाख ७ हजार ६०२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ५१ हजार ३५८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३७ हजार २७४ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के तर, रुग्ण दुपटीचा कालावधी १३८ दिवस इतका आहे. मुंबईमधील ३१८ इमारती आणि ११ झोपडपट्ट्या सील करण्यात आल्या आहेत. २७ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.५० टक्के इतका आहे.

८८ टक्के बेड रिक्त -

मुंबईत आज आढळून आलेल्या ८ हजार ८२ रुग्णांपैकी ७ हजार २७३ म्हणजेच ९० टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ५७४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ७१ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३० हजार ५६५ बेड्स असून त्यापैकी ३ हजार ७३५ बेड्सवर म्हणजेच, १२ टक्के बेड्सवर रुग्ण आहेत. इतर ८८ टक्के बेड रिक्त आहेत.

अशी वाढली रुग्णसंख्या -

मुंबईत 2020 च्या मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. 2021 साली फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारांवर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १३७७, २९ डिसेंबरला २५१०, ३० डिसेंबर ३६७१, ३१ डिसेंबरला ५६३१, १ जानेवारी 2021 ला ६३४७, २ जानेवारीला ८०६३, ३ जानेवारीला ८०८२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

या आठ दिवशी शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यांत १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारी 2021 ला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूची संख्या शून्य होत असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.

धारावीत २२० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण -

मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध आहे. या झोपडपट्टीत दाटीवाटीने लोक राहत असल्याने धारावी कोरोनाची हॉटस्पॉट झाली होती. पहिल्या लाटेदरम्यान धारावीत दिवसाला ७० हून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. ८ एप्रिलला दुसऱ्या लाटेत सर्वाधिक ९९ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने धारावीत गेले काही महिने १ ते ५ रुग्ण आढळून येत होते.

कित्तेकवेळा धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, आता मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याने धारावीतही रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या २४ तासांत धारावीत ४१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. या आधी १८ मे ला सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली होती. आज ४१ नवे रुग्ण आढळून आल्याने धारावीतील एकूण रुग्णांची संख्या ७३९८ इतकी झाली आहे. आतापर्यंत ६७६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या २२० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा - Mission Vatsalya Scheme : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३४५ तालुक्यांमध्ये 'मिशन वात्सल्य' - यशोमती ठाकूर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.