ETV Bharat / city

56 foundation of Shiv Sena : देशाच्या राजकारणात शिवसेना आता वरिष्ठ झाली आहे- संजय राऊत

author img

By

Published : Jun 19, 2022, 1:57 PM IST

Updated : Jun 19, 2022, 2:20 PM IST

आज शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन ( 56th Anniversary of Shiv Sena ) आहे. तर दुसरीकडे उद्या होणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या अशा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ( Legislative Council elections ) शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईतील वेस्ट ईन हॉटेलमध्ये ( West Inn Hotel in Mumbai ) ठेवण्यात आलेले आहे. या विषयी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) म्हणाले आहेत की शिवसेनेची ५६ वर्षाची वाटचाल पाहता आता शिवसेना देशाच्या राजकारणात पूर्णपणे परिपक्व ( Shiv Sena has fully matured in politics ) झाली असून ती आता महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

foundation of Shiv Sena
संजय राऊत

मुंबई - आज शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन ( 56th Anniversary of Shiv Sena ) आहे. तर दुसरीकडे उद्या होणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या अशा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ( Legislative Council elections ) शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईतील वेस्ट ईन हॉटेलमध्ये ( West Inn Hotel in Mumbai ) ठेवण्यात आलेले आहे. या विषयी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) म्हणाले आहेत की शिवसेनेची ५६ वर्षाची वाटचाल पाहता आता शिवसेना देशाच्या राजकारणात पूर्णपणे परिपक्व ( Shiv Sena has fully matured in politics ) झाली असून ती आता महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

शिवसेना घोंघावते संपूर्ण देशात - विधानपरिषद निवडणुकीविषयी ( Legislative Council elections ) बोलताना संजय राऊत म्हणाले की, मतांचा पाऊस पाडण्याची आम्हाला गरज नाही. आमचे बांध व धरणं आम्ही घालून ठेवलेली आहेत. शिवसेनेचा ५६ वा स्थापना ( 56th Anniversary of Shiv Sena ) दिवस आज आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ५६ वर्षापूर्वी याचा पाया रचला ( Balasaheb Thackeray laid the foundation of Shiv Sena ) होता. त्याच आज वादळ झालेल आहे. व हे वादळ संपूर्ण देशात सुटल आहे. देशाच्या राजकारणात शिवसेना आता महत्त्वाच्या भूमिकेत असून ती पूर्णपणे परिपक्व झालेली आहे. व याचे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जाते, असेही संजय राऊत म्हणाले. अब तक छप्पन व याच्यापुढे ही आमची वाटचाल योग्य दिशेने चालूच राहील असेही ते म्हणाले.

भाजपच्या मतांचा कोटा आम्हाला सांगा?- आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फक्त मुख्यमंत्री म्हणून नाहीतर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून भाषण करणार आहेत. व त्यांचे भाषण हे आम्हाला दिशा देणार असेल, असेही ते म्हणाले. विधानपरिषद निवडणुकीत कोण काय करत आहे यावर आमचे लक्ष असून, तिन्ही पक्षांचा आमच्या समन्वय आहे. त्याचबरोबर आमचा कोटा किती मतांचा असणार हे तुम्हाला सांगण्याची गरज नसून, जर भाजपचा कोटा किती मतांचा आहे हे तुम्हाला समजलं, तर आम्हाला नक्की सांगा. आम्ही त्यावर विचार करू, असा टोमणाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा - Shivsena Vardhapan Din 2022 : 'हृदयात राम आणि हाताला काम, हे आमचं हिंदुत्व'; वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचा टीझर

हेही वाचा - विमानतळावरून उड्डाण करताच स्पाइसजेट विमानाच्या इंजिनला लागली आग.. बिहारच्या पाटण्यातील घटना

हेही वाचा - LIVE : शिवसेना वर्धापनदिनानिमित्त मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Last Updated : Jun 19, 2022, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.