ST Workers Suspension : १३५ एसटी कर्मचारी निलंबित; कारवाईचा आकडा नऊ हजारांचा पुढे!

author img

By

Published : Dec 7, 2021, 10:38 PM IST

एसटी कर्मचारी आंदोलन

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप ( ST worker strike ) सुरू आहे. गेल्या एक महिन्याहून अधिक काळापासून राज्यभरातील प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी बंद असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. तर खासगी वाहन चालक प्रवाशांची ( Passengers suffered due to ST Workers strike ) लूट करत आहेत.

मुंबई - गेल्या एका महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप ( ST worker strike since 30 days ) सुरू आहे. कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करूनदेखील कर्मचारी दाद देत नसल्याने एसटी महामंडळाने अखेर संपकऱ्यांवर निलंबनाची ( ST employees suspension ) आणि सेवा समाप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली. एसटी महामंडळाने आज १३५ एसटी कर्मचारी निलंबित केले आहे.

एसटी महामंडळाने आजपर्यंत राेजंदारीवरील २ हजार १४ कर्मचाऱ्यांची सेवा ( ST dismissed workers from service ) समाप्त केली आहे. तर ९ हजार ६२५ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

हेही वाचा-Shivsena Joining UPA Possibility - शिवसेनेचा युपीएत प्रवेश होणार का? ते येणारा काळच सांगेल - खासदार संजय राऊत

परिवहन मंत्र्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. गेल्या एक महिन्याहून अधिक काळापासून राज्यभरातील प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी बंद असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. तर खासगी वाहन चालक प्रवाशांची लूट ( Passengers suffered due to ST Workers strike ) करत आहेत. भरघोस वेतनवाढ देऊन परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीही एसटी कर्मचारी संपावर आहेत.

हेही वाचा- संजय राऊत, राहुल गांधी यांची बैठक संपली; काँग्रेसशिवाय युतीबाबत राऊत म्हणाले...



२६४ कर्मचाऱ्यांवर कारवाई -

एसटी महामंडळाने वेतनवाढ देऊनही संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ६ डिसेंबर पर्यंत २२० कर्मचाऱ्यांचे निलंबन तर ४४ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई विभागात ३८ बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ४ डिसेंबर रोजी २० तर ६ डिसेंबर रोजी १८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बदल्यातील ३८ कर्मचाऱ्यांमध्ये ३२ वाहक आणि चालक आहेत.

हेही वाचा-Maharashtra Corona Update : 1087 रुग्णांना डिस्चार्ज, 699 नवे रुग्ण तर 19 रुग्णांचा मृत्यू

परिवहन मंत्र्यांचा संकेतानंतर भरती प्रक्रिया-
एसटी कर्मचाऱ्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वी मोठे वक्तव्य केले आहे. कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना कामावून घेण्याचे स्पष्ट संकेतल अनिल परब यांनी दिले आहे. त्यानुसार आता आधीच्या भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना म्हणजे 2016-17आणि 2019 मधील उमेदवारांना सेवेत घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावलं आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही महामंडळाने सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे.

कारवाईच्या धास्तीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कर्तव्यावर हजर होत आहे. राज्यभरात संप सोडून १८ हजार ८८८ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.